Alia Bhatt Grandfather Passes Away: आलियावर कोसळला दुःखाचा डोंगर.. अभिनेत्रीच्या आजोबांचे निधन..

आजोबा आजारी असल्याकारणानं आलिया आपला कान्स दौरा देखील अर्धवट सोडून आली होती.
Alia Bhatt Grandfather Passes Away
Alia Bhatt Grandfather Passes AwayEsakal

Alia Bhatt Grandfather Passes Away: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच स्माईली फेस घेऊन वावरताना दिसते. पण आजचा दिवस मात्र तिच्यासाठी दुःखाचा दिवस ठरला आहे. आलिया भट्टचे आजोबा आणि सोनी राझदान यांचे वडील नरेंद्र राझदान यांचे निधन झाले.

९३ व्या वर्षी आलियाच्या आजोबांनी अखेरचा श्वास घेतला. भट्ट परिवारात आज दुःखाचं वातावरण आहे. नरेंद्र राझदान गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी बातमी होती की आजोबा आजारी असल्या कारणानं आलिया कान्सचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतली होती.

Alia Bhatt Grandfather Passes Away
Vivek Agnihotri: 'सगळं मुर्खासारखं सुरू होतं..', बॉलीवूडच्या कलाकारांवर का भडकले अग्निहोत्री?
Alia Bhatt Grandfather Passes Away
R Madhavan Birthday: यावर्षी वाढदिवसाला माधवन करणार 'ही' आवडती गोष्ट.. म्हणाला..

आलिया आपला जास्तीत जास्त वेळ तिच्या आजोबांसोबत घालवायची. त्यामुळेच तर ती त्यांच्यासाठी कान्स फेस्टिव्हल अर्धवट टाकून आली होती. आलियानं आजोबांना श्रद्धांजली अर्पण करत सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी दिली.

राझदान यांना गेल्या आठवड्यात मुंबईतील इस्पितळात दाखल केलं गेलं होतं. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळले होते. आलियानं आजोबांच्या ९२ व्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओत नरेंद्र राझदान ९२ वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत रणबीर कपूर देखील दिसत आहेत. तर आलिया आजोबांना मागनं चियर करताना दिसत आहे.

या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं आहे की,'' माझे आजोबा,माझे हिरो. वयाच्या ९३ पर्यंत गोल्फ खेळले, काम केलं आणि सगळ्यात चांगलं ऑम्लेट बनवलं, खूप चांगल्या कथा ऐकवल्या,व्हायोलिन वाजवलं आणि आपल्या पणतीसोबतही खेळले''.

Alia Bhatt Grandfather Passes Away
Katrina-Vicky First Meet Video Viral: समोर आला कतरिना-विकीचा पहिल्या भेटीचा व्हिडीओ..पाहताच अभिनेत्रीला म्हणाला होता..

आलियानं पुढे लिहिलंय..आज दुःखानं मन भरलं आहे पण तितकाच आनंदही आहे मनात. कारण माझ्या आजोबांनी जे काही आयुष्यात केलं त्यानं मला नेहमीच आनंद दिला आहे. मला आनंद आहे मी माझ्या आजोबांच्या सान्निध्यात वाढलेय. आलियाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. करण जोहरनं देखील आलियाच्या पोस्टवर कमेंट इमोजी पोस्ट केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com