बाब्बो! चुलबुली आलिया पडली होती आजारी; हॉस्पिटलमधून पुन्हा सेटवर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

सतत शूटिंगच्या दगदगीमुळे आलियाची तब्बेत अचानक बिघडली. हायपर ॲसिडीटी आणि नॉशिया झाल्यामुळे तिला मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये ॲडमीट करण्यात आलं होतं. 

सतत शूटिंगच्या दगदगीमुळे आलियाची तब्बेत अचानक बिघडली. हायपर ॲसिडीटी आणि नॉशिया झाल्यामुळे तिला मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये ॲडमीट करण्यात आलं होतं. 

पण आलिया लवकर रिकव्हर झाल्यामुळे तिला डॉक्टरांनी एका दिवसात डिस्चार्ज दिला. त्यानंतर ती संजय लीला भंसाली निर्मित 'गंगुबाई काठीयावाडी' या चित्रपटाच्या शुटिंगला लगेचच सज्ज झाली. कामाबाबत तिच्या एकनिष्ठेमुळे सगळ्यांनी तिचे कौतुक केलं आहे. कोरोनामुळे या चित्रपटाच्या शुटिंगला उशिर झाला होता. पण आता आरोग्याच्या कारणांमुळे अजून उशीर होऊ नये म्हणून आलियाने शुटिंगला सुरूवात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2 महिने नाईट शिफ्टमध्ये शुटिंग केल्यानंतर आलिया सुट्टीसाठी 'रनथंबोर नॅशनल पार्क' येथे आपल्या कुटुंबासोबत गेली होती. नंतर डे शूट करून  तिने 'आरारा' या चित्रपटाचे शूटिंग आणि डबिंग पूर्ण केले. या दगदगीमुळेच आलियाची तब्बेत बिघडली होती, असं म्हटलं जातंय.

'वायफळ चर्चा, कंगणाचं व्टिटरनं अकाऊंट केलं बंद'

आलियाच्या 'गंगुबाई काठीयावाडी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आधी प्रियांका चोप्रा या चित्रपट काम करणार होती, तेव्हा या चित्रपटाचे नाव 'हिरा मंडी' असे होते. पण त्या नंतर आलीयाला या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका मिळाली. त्यानंतर या चित्रपटाचे नाव 'गंगुबाई काठीयावाडी' असे करण्यात आले. आलीया बरोबरच अजय देवगण, इम्रान हाश्मी आणि हुमा कुरेशी हे कलाकार गंगुबाई काठियावाडी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. डियर जिंदगी, हायवे, स्टुडन्ट ऑफ द इयर आणि उडता पंजाब यांसारख्या चित्रपटांमधून आलियाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

'अमिताभ यांनी शब्द टाकला, पोलीस पत्नीची बदली झाली' 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alia bhatt hospitalized back to shooting