'आलिया चांगली आई आहे की चांगली पत्नी?' रणबीरनं दिलेलं उत्तर ऐकून जो-तो हैराणAlia Bhatt is better mother or better wife? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt is better mother or better wife? what Ranbir kapoor says..

Ranbir Kapoor: 'आलिया चांगली आई आहे की चांगली पत्नी?' रणबीरनं दिलेलं उत्तर ऐकून जो-तो हैराण

Ranbir Kapoor: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'तू झूठी मैं मक्कार' सिनेमाच्या प्रमोशन मध्ये भलताच बिझी होता. पण आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे दोन दिवसांत रणबीरच्या या सिनेमानं बॉक्सऑफिसवर २५ करोडची कमाई केली आहे.

रणबीर आपल्या प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असलेला पहायला मिळतो. अनेकदा त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी प्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तर दिल्यानंतर अभिनेता चर्चेत येतोच येतो.

नोव्हेंबर २०२२ मध्ये आलिया भट्टसोबत लग्न आणि एप्रिल २०२२ मध्ये त्याची मुलगी राहा कपूरचा जन्म झाल्यानंतर आता लोकांना रणबीर विषयी खूप गोष्टी जाणून घेण्यात इंट्रेस्ट असतो.

'तू झूठी..मै मक्कार' सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं रणबीरला विचारलं गेलं होतं की 'आलिया..चांगली पत्नी आहे की आई?' अभिनेत्यानं उत्तर देत सर्वांनाच हैराण केलं आहे. (Alia Bhatt is better mother or better wife? what Ranbir kapoor says..)

सिद्धार्थ कननसोबत एका प्रमोशन इव्हेंटमध्ये रणबीर कपूर बोलत होता. त्यावेळी त्याला विचारलं गेलं की, 'तो राहाचे डायपर्स बदलतो का?'

तेव्हा अभिनेता म्हणतो,''हे काम मी खूप सहज करतो''

. तसंच तो म्हणाला,''राहाला दूध पाजल्यानंतर चांगला ढेकर यावा म्हणून जे करावं लागतं ते देखील मला उत्तम जमतं''.

रणबीर पुढे म्हणाला,''खूप लोकांना हे माहित नसेल..खासकरुन ज्यांना अजून मुलं व्हायचीयत त्यांना तर याची थोडीदेखील कल्पना नसावी . सुरुवातीच्या काही महिन्यात बाळाला दूध प्यायल्यानंतर चांगला ढेकर येणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक वेळेस जेव्हा बाळाला दूध पाजलं जातं तेव्हा कमीत कमी दोनदा त्याला ढेकर यायला हवा..आणि त्याची एक खास टेक्निक असते ज्यात मी आता मास्टर झालोय''.

पुढे रणबीरला रॅपिड राऊंड दरम्यान विचारलं गेलं की,'आलिया भट्ट चांगली पत्नी आहे की चांगली आई?'

तेव्हा रणबीरनं घरी गेल्यावर बायकोही रागावू नये म्हणून अगदी चोख उत्तर दिलं. तो म्हणाला,''ती दोन्ही गोष्टी खूप उत्तम हॅंडल करते. पण मी आता सांगेन की ती आई जास्त चांगली आहे''. रणबीरचं हे उत्तर ऐकून लोकही म्हणत आहेत 'मुलगा समंजस झाला...',कुणी म्हणतंय,'मुलगा सुधारला...' तर रणबीरचं हे शहाणपणाचं उत्तर अनेकांना हैराणही करून गेलंय.

थोडं इथे माहितीसाठी सांगतो की,मागे रणबीरनं एका मुलाखतीत म्हटलं होतं की राहानं आलियासारखं दिसलं तरी चालेल पण तिचं व्यक्तीमत्त्व माझ्यासारखं असावं.

रणबीरनं हसत-हसत हे देखील म्हटलं होतं की दोघी जर एकसारख्या असल्या तर मग मला त्यांना सांभाळणं कठीण होईल..

हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

रणबीरच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर' तू झूठी..मै मक्कार' हा त्याचा सिनेमा होळी सणाच्या शुभ मुहूर्ताला रिलीज झाला..ज्याला चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. लव रंजन दिग्दर्शित या सिनेमात रणबीरसोबत श्रद्धा कपूर पहिल्यांदाच काम करत आहे.

त्यानंतर लवकरच रणबीर 'एनिमल' सिनेमात रश्मिका मंदानासोबत दिसणार आहे. या सिनेमात अनिल कपूर,बॉबी देओल देखील आहेत.

याव्यतिरिक्त रणबीर सौरव गांगुलीच्या बायोपीकमध्ये दिसणार असल्याचं देखील बोललं जात आहे.