आलिया भट्ट रमणार युट्यूबच्या जगात; पहिला व्हिडीओ लाँच

alia bhatt launhes her you tube channel shared first video
alia bhatt launhes her you tube channel shared first video

बॉलिवूडची क्युट गर्ल आलिया भट्ट सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ, फोटोतून फॅन्सचं मनोरंजन करत असते. आता या मनोरंजनात आणखी भर पडणार आहे. कारण आलियाने जरा आणखी टेक्नोसेवी होत यु ट्यूबवर स्वतःचे चॅनेल सुरु केलं आहे. 

आलियानं तिचं युट्यूब चॅनेल लाँच केल्यानंतर पहिला व्हिडीओ शेअर केला. या चॅनेलवरुन आलिया तिच्या फॅन्सना मेकअप, फॅशन, फिटनेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं शेड्यूल शेअर करणार आहे. 

युट्यूब चॅनेल लाँच केल्यानंतर केवळ तासाभरातच 32 हजार लोकांनी हे चॅनेल सब्सक्राइब केलं आहे. आलिया सध्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. आलिया इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर सतत अॅक्टिव्ह असते. तिने अनेकवेळा तिच्या प्रवासादरम्यानचे व्हिडीओही शूट केले आहे. आता यू ट्यूब चॅनेलनेही सोशल मिडीयावर आलिया चमकणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com