हॉलीवूडच्या सेटवर आलियाला 'New Comer'ची वागणूक? पोस्ट करत म्हणाली... Alia Bhatt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt

हॉलीवूडच्या सेटवर आलियाला 'New Comer'ची वागणूक? पोस्ट करत म्हणाली...

'गंगूबाई काठियावाडी' आणि 'आरआरआर' सिनेमाला मिळालेल्या चाहत्यांच्या अफाट प्रतिसादानंतर आता आलिया भट्ट(Alia Bhatt) आपल्या पहिल्या-वहिल्या हॉलीवूड(Hollywood) सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करीत आहे. आलिया आपल्या इंटरनॅशनल फॅन्सना आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करायला सज्ज झाली आहे. या निमित्तानं आलिया भट्टनं सोशल मीडियावर(Social Media) एक पोस्ट शेअर केली आहे. तिनं सांगितलं आहे की,''ती आपल्या हॉलीवूड सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरु करीत आहे. पण त्यामुळे तिचं मन थोडं अस्वस्थ झालंय,धकधक होतंय. असं तिनं पोस्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे''.

हेही वाचा: कान्सच्या रेडकार्पेटवर ऐश्वर्याचं काय चुकलं? का केलं जातंय ट्रोल?

आलिया भट्ट नेटफ्लिक्सच्या स्पाय थ्रिलर असलेल्या 'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमात काम करीत आहे. यासाठी ती हॉलीवूडला रवाना झाली आहे. या सिनेमात गॅल गॅडोटसोबत ती दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन टॉम हर्परनं केलं आहे. आलिया भट्टने शूटिंग सुरु करण्याआधी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे,''मी माझ्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचं शूटिंग करायला सुरुवात करीत आहे. पण मला वाटतंय की मी नवोदित अभिनेत्री आहे. खूप धाकधूक होतेय मनात. अस्वस्थता वाढली आहे. मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे''.

'हार्ट ऑफ स्टोन' मध्ये आलिया भट्ट कोणती भूमिका साकारत आहे,तिचा त्यात लूक कसा असेल याविषयी अनेक गोष्टी समोर यायच्या आहेत अजून. गॅल गॅडोटनं सिनेमाचं शूटिंग आलियाच्या आधीच सुरु केलं आहे,तिनं याआधीच तिचा सिनेमातील लूक समोर आणणारा फोटो शेअर केला होता. आता आलियाच्या चाहत्यांना सेटवरील तिच्या फोटोची-व्हिडीओची प्रतिक्षा आहे.

हेही वाचा: 'Cannes' च्या मंचावर टॉम क्रुझ का रडला?, पाहून उपस्थितही झाले भावूक

आलियानं हॉलीवूड सिनेमासंदर्भात पोस्ट शेअर केल्यानंतर सर्वसामान्य चाहत्यांपासून बॉलीवूडकरांपर्यंत साऱ्यांनीच तिला शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश देशमुख म्हणालाय,''अग तू त्यांच्या सिनेमात काम करणार तर ते नर्वस असतील,त्यांनी अभ्यास केला असेल''. तर अर्जुन कपूरनं तिला थेट,'इंटरनॅशनल खिलाडी' म्हणून संबोधलं आहे. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने देखील आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. नणंद रिद्धिमा कपूर,हुमा कुरेशी यांनीही हार्ट इमोजी पोस्ट करत आलियाचं कौतूक केलं आहे.

हेही वाचा: 'या' कारणामुळे 'तारक मेहता' मधून गायब आहेत शैलेश लोढा,शूटिंगही थांबवलय

आलियाच्या आगामी सिनेमांविषी बोलायचं झालं तर ती आता 'ब्रह्मास्त्र' सिनेमातून तिचा नवरा रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाची सगळे प्रेक्षक चातकासारखी वाट पाहत आहेत. कारण खूप दिवसांपासून हा सिनेमा प्रदर्शनासाठी रखडला आहे. फरहानच्या 'जी ले जरा' या सिनेमाच्या शूटिंगलाही आलिया लवकरच सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात तिच्यासोबत प्रियंका चोप्रा आणि कतरिना कैफ देखील काम करीत आहेत.

Web Title: Alia Bhatt Post About Hollywood Film Shooting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top