रणबीरच्या वाढदिवसानिमित्त आलियाने शेअर केला 'हा' फोटो

वृत्तसंस्था
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

रॉकस्टार रणबीर कपूरचा आज 37 वा वाढदिवस आहे. आजच्या खास दिवशी गर्लफ्रेंड आलियाने रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मुंबई : रॉकस्टार रणबीर कपूरचा आज 37 वा वाढदिवस आहे. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणार रणबीर सध्या आलिया भटला डेट करत आहे. या नात्याला त्यांनी उघडपणे मान्य केलं आणि अनेकदा ते दोघं एकत्र दिसतात. एवढच काय तर हे दोघ त्यांच्या कुटुंबासोबतही वेळ घालवताना दिसतात. बॉलिवूडमध्ये चाहत्यांच्या फेवरेट कपलपैकी एक जो़डी रणबीर आणि आलियाची आहे. आजच्या खास दिवशी गर्लफ्रेंड आलियाने रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

इन्स्टाग्रामवर आलियाने रणबीरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीर ब्लॅक टि-शर्टमध्ये आणि हॅटसह दिसत आहे. फोटोला कॅप्शन देताना आलियाने ' हॅपी बर्थडे यू' असं लिहिलं. चाहत्यांनी या फोटोला चांगलीच पसंती दिली आहे. विशेष म्हणजे या फोटोला आलियाची आई सोनी राजदान यांनी ही कमेंट केली. कमेंटमधून त्यांनी रणबीरला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

happy birthday you

A post shared by Alia (@aliaabhatt) on

रणबीरने त्याच्या वाढदिवसानिमित्त एका जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये रणवीर सिंग, दिपीका पदूकोन, आमिर खान, किरण राव, शाहरुख खान,गौरी खान, करण जौहर, जोया अख्तर, प्रीतम, अनुराग बसु असे अनेक बॉलिवूड स्टार सामिल होते. त्यावेळी ऋषी कपूर आणि नीतू कपूरदेखील या पार्टीमध्ये होते. या पार्टीमधला रणबीर आणि आलियाचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. फोटोग्राफर विराल भयानी याने इन्स्टाग्रामवर हा फोटो अपलोड केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#ranbirkapoor #aliabhatt last night at the birthday bash

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

रणबीर आणि आलिया आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र' मध्ये एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जीने दिग्दर्शन केलेल्या हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alia Bhatt shares boyfriend Ranbir Kapoor s pic and wishes him