'लँड करा दे भाई' आलियाची नवी जाहिरात, हसुन पोटात दुखेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

alia bhatt shares screen land kara de viral meme fame vipin kumar

'लँड करा दे भाई' आलियाची नवी जाहिरात, हसुन पोटात दुखेल

इंटरनेटवर 'लँड करा दे' हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता तुम्हाला आठवत आहे का ? या व्हिडिओमध्ये विपिन कुमार नावाचा हा व्यक्ती पॅराग्लायडिंग करताना ओरडताना आणि घाबरताना दिसत आहे होता. विपिन वारंवार ओरडत होता आणि त्याच्या साथीदाराला सांगत होता की, 200 रुपये जास्त घे पण जमिनीवर उतरव. यासोबतच विपिन स्वत:ला शिव्या देतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता विपिन कुमारचा आलिया भट्टसोबत एका नवीन व्हिडिओ आला आहे.(Alia Bhatt Shares Screen Land Kara De Viral Meme Fame Bipin Kumar)

हेही वाचा: असा विक्रम करणारा धोनी हा एकमेव विकेटकिपर

आलियासोबत जाहिरातीत काम केले आहे. विपिनने आलिया भट्टसोबतचा त्याचा व्हायरल व्हिडिओ रिक्रिएट केला आहे. या व्हिडिओमध्ये विपिनचा सहकारी पॅराग्लायडर आलिया बनली आहे. विपिन पूर्वीप्रमाणेच उतरण्याची मागणी करत असून राईडला घाबरत होता. त्यावेळी आलिया शांतपणे त्याला विचित्रपणे पाहत आहे. यानंतर आलिया स्वत:ची पर्क चॉकलेट विपिनला खायला देते. मग विपिनही शांत होतो.

हेही वाचा: CSK आणि जडेजा यांच्यात वाद ? संघाने इन्स्टाग्रामवरून केल अनफॉलो

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या विपिन कुमारने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, कोण म्हणतं की एक मीम उंची गाठू शकत नाही? कोण म्हणतो की मेमचे आयुष्य एक किंवा दोन महिने असते? या सर्व गोष्टी बकवास आहेत. विपिन कुमारने यासोबतच आलिया भट्टचेही आभार मानले आहे. त्यानंतर कॅडबरीचेही आभार मानले. तो म्हणाला की हे स्वप्नासारखे आहे.

Web Title: Alia Bhatt Shares Screen Land Kara De Viral Meme Fame Vipin Kumar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top