Alia Bhatt : 'नको ते बोलून गेली, गोत्यात आली!' मोठ्या गप्पा आल्या ना अंगाशी?

तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आलियाची बोलण्याची जी पद्धत आहे त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
Alia Bhatt trolled Gender Equality function trolled social media
Alia Bhatt trolled Gender Equality function trolled social mediaesakal

Alia Bhatt trolled Gender Equality function trolled social media : आलिया भट्टविषयी बोलायचे झाल्यास ती आता प्रसिद्ध सेलिब्रेटी झाली आहे. ती एक इंटरनॅशनल सेलिब्रेटी झाली आहे. आलियाच्या नावाला मोठं ग्लॅमरही आलं आहे. यापूर्वी आलिया तिच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली होती. आलियाला एका कार्यक्रमाचे निमंत्रण आले होते. त्या कार्यक्रमामध्ये केलेलं भाषण आलियाच्या अंगलट आलं आहे.

आपल्या भाषणामध्ये आलियानं म्हटले आहे की, जर तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही हवं ते करु शकता. तुमची सर्जनशीलताही वाढीस लागते. हे सगळं काही मुलं, समुदाय, समाज यांच्या निकोप वाढीसाठी हे सगळं महत्वाचं आहे.आलियानं ते भाषण इतक्या उत्साहानं दिलं की त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. कार्यक्रमाचा विषय आणि तिचं भाषण हे आलियाच्या व्यक्तिमत्वाशी तितकेसे संयुक्तिक नव्हते. असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Also Read - Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आलियाची बोलण्याची जी पद्धत आहे त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एकानं कमेंट दिली आहे की, आलिया तुझं पाठांतर चांगलं आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, असं वाटते आहे की,तू चांगली तयारी करून आली आहे. पण तू जे काही बोलते आहेस त्याविषयी तुला काही माहिती आहे की नाही, याचाही विचार कर. प्रॅक्टिस तर खूप केली आहेस पण तुझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे.

तिसऱ्या कमेंटमध्ये असे म्हटले गेले आहे की, महिलांचे सक्षमीकरण झालेच पाहिजे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना वाचाही फोडली पाहिजे. आपल्या पूर्ण समाज हा अधिक सजग करण्याची गरज आहे. हेही लक्षात घ्यायला हवे. अशा प्रकारची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहे. मात्र यासगळ्यात आलिया मोठमोठ्या गप्पा करणं हे चांगलेच महागात पडल्याचे दिसून आले आहे.

Alia Bhatt trolled Gender Equality function trolled social media
Kerala Tour: तुम्हाला ही केरळच्या निसर्ग सौंदर्यात हरवायचं आहे? मग या ठिकाणांना नक्की भेट द्याच ...

आलिया ही काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. त्याचे कारण ती ७६ व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिच्या फोटोंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. आलियाचं ते पहिलंच कान्स डेब्यू होता. याप्रसंगी आलियानं व्हाईट कलरचा गाऊन परिधान केला होता. वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाल्यास, आलियाचा रॉकी और रानी की प्रेम कहानी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत रणवीर सिंह दिसणार आहे.

Alia Bhatt trolled Gender Equality function trolled social media
Alia Bhatt Grandfather Passes Away: आलियावर कोसळला दुःखाचा डोंगर.. अभिनेत्रीच्या आजोबांचे निधन..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com