
Alia Bhatt ला Boycott करा...; आमिर-अक्षयनंतर आता आलियावर भडकले लोक
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) सध्या आपल्या प्रेग्नेंसीच्या बातमीसोबतच आगामी 'डार्लिंग्स'(Darlings) सिनेमामुळे देखील चर्चेत आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा ५ ऑगस्टला रिलीज होत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आलिया निर्माती म्हणून समोर येत आहे,पण याआधी सोशल मीडियावर या सिनेमाला बॉयकॉट(Boycott) करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. ट्वीटरवर #BoycottAliaBhatt ट्रेंड होताना दिसत आहे. याआधी आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाला आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधन सिनेमावर बहिष्काराची मागणी केली गेली, पण आता आलिया देखील या हिट लिस्टमध्ये सामिल झाली आहे. पण असं का घडतंय? चला जाणून घेऊया.(Alia Bhatt twitter trend celebrating domestic Voilence on men in darlings Movie.)
हेही वाचा: Taiwan मध्ये फेमस भारतीय सिनेमे, विदेशी मंत्र्याने केली बाहुबलीची पारायणं
आलिया भट्टसोबत 'डार्लिंग्स' सिनेमात शेफाली शहा,विजय वर्मा, रोशन मॅथ्यू सारखे दमदार कलाकारही आहेत. या सिनेमाला जसमीत रीनने दिग्दर्शित केलं आहे. तर गौरी खान, आलिया भट्ट आणि गौरव वर्मा यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाला संगीत विशाल भारद्वाजने दिलं आहे. तर सिनेमाचे गीतकार गुलजार आहेत. सिनेमाची कथा परवेज शेख आणि जसमीत के रीन यांनी मिळून लिहिली आहे. नेटफ्लिक्स आणि शाहरुखची रेड चिलीज एंटरटेन्मेंट सिनेमाचे प्रस्तुतकर्ता आहेत. या सिनेमाचा ट्रेलर २५ जुलै रोजी रिलीज केला गेला होता.
हेही वाचा: Koffee With Karan7: सेक्स लाईफ आणि प्रेग्नेंसीविषयी कतरिना करणार खुलासा
ट्रेलरमध्ये दाखवलं गेलं आहे की, विजय वर्मा हमजा शेखची भूमिका साकारत आहे. तो म्हणताना दिसत आहे की तो बदरुनिसा शेख (आलिया भट्ट) चा पती आहे. त्याचं आपल्या बायकोवर खूप प्रेम आहे,पण तरी तो तिला सोडून जात आहे. यानंतर आलिया एका वेगळ्याच रुपात समोर येते, जी आपल्या नवऱ्याला थांबवण्यासाठी खूप पद्धती अवलंबते. जेव्हा तिला कळंत की हमजा घरी नाहीय तेव्हा ती आपल्या आईसोबत पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करते. आणि यानंतर सुरु होते खरी कहाणी.
ट्रेलरमध्ये भन्नाट सस्पेन्स पहायला मिळतो. स्पष्ट कळतं की हमजा हरवलेलाच नाहीय,तर त्याच्या पत्नीनं आणि तिच्या आईनं त्याला अद्दल घडवण्यासाठी बंदिस्त करुन ठेवलं आहे. पण त्यांनी असं का केलं? याचाच उलगडा सिनेमा पाहिल्यावर होईल. तसं सगळेच अंदाज लावू शकतात की यामागे मोठं कारण आहे, तेव्हा तर दोन महिला मिळून एका पुरुषाला अद्दल घडवतायत. ट्रेलरमध्ये दाखवलं गेलं आहे की सुरुवातीला हमजा आपल्या पत्नीवर अत्याचार करतो. त्यानंतर पत्नी कालीचं रुप धारण करते. आता प्रश्न हा उठतो की या सगळ्यात गैर काय आहे की लोक आलियाच्या 'डार्लिंग्स' सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत.
तुम्हाला थोडं स्पष्ट करुन इथे सांगतो की,सिनेमात पुरुषावर होणाऱ्या अत्याचाराला सेलिब्रेट केलेली गोष्ट आक्षेपार्ह असल्याच बोललं जात आहे. सिनेमात पुरुषाला छळणं खूप विनोदी पद्धतीने दाखवलं गेलं आहे. बॉयकॉट करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, आरोप हा आरोप असतो, तिथे लिंगभेद नसावा. जर हेच अत्याचार एखाद्या महिलेसोबत होताना दाखवले असते तर हंगामा झाला असता,मग पुरुषासोबतच असं का? लोकांचे असे देखील म्हणणे आहे की प्रत्येक पुरुष वाईट,महिलांना त्रास देणारा असतो हा समजच चुकीचा आहे. उलट,प्रत्यक्ष आयुष्यात कितीतरी महिलांनी पुरुषांवर खोटे आरोप लावले आहेत,जे उघडही झाले कालावधीनंतर. असेच काही ट्वीट व्हायरल होताना दिसत आहेत, आणि 'बॉयकॉट आलिया भट्ट' ट्रेंड होताना दिसत आहे.
एका नेटकऱ्याने 'डार्लिंग्स'च्या ट्रेलरच्या क्लीपला शेअर करत प्रश्न केला आहे की,पुरुषांविरोधात कौटुंबिक अत्याचाराला खूप सामान्य आणि मजेशीर पद्धतीनं का दाखवलं जातं. भारतात जवळपास साडे तीन करोड पुरुष कौटुंबिक अत्याचाराचा सामना करत आहेत. त्यामुळे 'डार्लिंग्स'मध्ये जे दाखवलंय ते आम्हाला मान्य नाही. आलिया विरोधात असे अनेक ट्वीट सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. काही या संबंधातले ट्वीट्स आम्ही बातमीत जोडलेले आहेत.
Web Title: Alia Bhatt Twitter Trend Celebrating Domestic Voilence On Men In Darlings Movie
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..