Koffee With Karan7: सेक्स लाईफ आणि प्रेग्नेंसीविषयी कतरिना करणार खुलासा Katrina Kaif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Katrina Kaif

Koffee With Karan7: सेक्स लाईफ आणि प्रेग्नेंसीविषयी कतरिना करणार खुलासा

Karan Johar करण जोहरचा कॉफी विथ करण(Koffee With karan) या चॅट शो चा नवा सिझन सुरू झाला आहे. प्रत्येक एपिसोडगणिक येणारे नवीन सेलिब्रिटी त्यांचे सीक्रेट्स करण सोबत शेअर करताना दिसत आहेत. पण ते ऐकल्यानंतर सर्वसामान्य चाहत्यांना मात्र धक्का बसतोय एवढं नक्की. आता लवकरच या शो मध्ये कतरिना कैफ(Katrina Kaif) देखील एन्ट्री करणार आहे. कतरिना सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरसोबत शो मध्ये आलेली दिसणार आहे. कतरिनाच्या या एपिसोडची चाहते मात्र मनापासून वाट पाहत आहेत. बोललं जात आहे की करणच्या या शो मध्ये कतरिना अनेक खुलासे करताना दिसेल.(Katrina Kaif will talk about sex life and Pregnancy in koffe with karan 7 show.)

हेही वाचा: Bharti Singh ला मुलाकडून आहे खास अपेक्षा; म्हणाली,'१८ वर्षांचा झाल्यावर...'

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,करण जोहरच्या चॅट शो मध्ये कतरिना कैफ विक्की कौशल सोबतच्या आपल्या लव्हलाईफविषयी बोलणार आहे. त्या दोघांची पहिली भेट,मग मैत्री,प्रेम इथपासून ते लग्नाचा निर्णय या सर्वावर कतरिना मनमोकळा संवाद साधताना दिसेल. तसंच,करण जोहरच्या या शो मध्ये कतरिना लव्ह लाईफविषयी देखील खुलासे करेल. विकी आणि तिच्या सेक्सलाईफ विषयी देखील ती ओपनली बोलणार आहे. याव्यतिरिक्त कतरिना आपल्या प्रेग्नेंसीच्या ज्या बातम्या पसरल्या होत्या त्यावरही खुलासा करणार आहे.

हेही वाचा: Laal Singh Chaddha वादात आता आमिर नाही,मिलिंद सोमण ट्रोलर्सच्या निशाण्यावर

सूत्रांनी असं देखील सांगितलं की,कतरिना कैफच्या एपिसोडमध्ये विक्की कौशलच्या रेकॉर्डेड व्हिडीओला देखील दाखवलं जाईल,ज्यात तो आपल्या प्रिय बायकोची प्रशंसा करताना दिसेल. आणि अभिनेत्रीसोबतच्या लव्ह लाईफविषयी देखील बोलेल. असं पहिल्यांदा होईल जेव्हा लग्नानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल आपल्या प्रेमाविषयी सर्वांसमोर बोलतील.

Web Title: Katrina Kaif Will Talk About Sex Life And Pregnancy In Koffe With Karan 7

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top