आलिया होणार "गंगूबाई'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

गंगूबाई कोठेवाली यांचा हा बायोपिक असणार आहे. आलियासोबत या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

अभिनेत्री आलिया भटच्या "उडता पंजाब', "राझी', "गली बॉय'सारख्या अनेक चित्रपटांनी बॉक्‍स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता लवकरच ती संजय भन्साळींच्या "गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात झळकणार आहे.

या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या नावाची चर्चा होती; मात्र आलिया या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार हे नक्की झाले आहे. संजय भन्साळी यांचा हा चित्रपट जर्नलिस्ट एस. हुसैन जैदी यांच्या "माफिया क्वीन ऑफ मुंबई गंगूबाई कोठेवाली' या पुस्तकावर आधारित आहे.

गंगूबाई कोठेवाली यांचा हा बायोपिक असणार आहे. आलियासोबत या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 11 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आलियाला "गंगगूबाई'च्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते फारच उत्सुक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alia bhatt will play role of gangubai in Gangubai Kathiyawadi