राजामौली दिग्दर्शित 'RRR' सिनेमामधील आलियाच्या शूटिंगला होतोय उशीर, दिग्दर्शक भन्साळी कारणीभूत

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 19 November 2020

आलिया भट्ट संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमाचं शूट मुंबईतील फिल्म सिटीमध्ये करतेय. ही लांबलचक शूटिंग ऑक्टोबरमध्ये संपणं अपेक्षित होतं

मुंबई-  बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टकडे अनेक प्रोजेक्ट्सची लाईन लागली आहे. त्यामुळे आता तिच्या कामातील अडचणी वाढत आहेत. आलिया भट्ट मेहनतीने आणि घाईघाईने संजय लीला भन्साळी यांच्या आगामी 'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमाचं शूट मुंबईतील फिल्म सिटीमध्ये करतेय. ही लांबलचक शूटिंग ऑक्टोबरमध्ये संपणं अपेक्षित होतं मात्र याचं शेड्युल आणखी दोन आठवड्यांनी आता वाढवलं गेलं आहे.

हे ही वाचा: अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा झटका  

सुत्रांच्या माहितीनुसार, हे स्पष्ट आहे की भन्साळी यांना त्यांच्या 'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमाचं शूट लवकरात लवकर संपवायचं आहे. त्यांनी त्यांचं शेड्युल आता दोन आठवड्यांनी वाढवलं आहे जेणेकरुन गंगुबाईचं जास्तीत जास्त शूटिंग संपेल. त्यानंतर आणखी एक शेड्युल पूर्ण करावं लागेल आणि मग संपूर्ण सिनेमाचं शूट पूर्ण होईल. मात्र भन्साळी यांच्या वाढीव दोन आठवड्यांमुळे आलियाचा दुसरा सिनेमा 'RRR' च्या शूटिंगला उशीर होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

एस एस राजामौली यांच्या या सिनेमाच्या शूटींगसाठी आलियाला वेळंच पुरेसा पडत नाहीये. स्वतःचं काम पूर्ण करण्यासाठी आलिया जीवतोडून मेहनत घेत आहे मात्र सगळंकाही तिच्या हातात नसल्याने आता अडचणी निर्माण होत आहेत. 

'गंगुबाई काठियावाडी' या सिनेमात अभिनेता आणि डान्सर शांतनु महेश्वरी आलियासोबत हिरो असल्याचं कळतंय. या सिनेमातून शांतनूने मोठा मुव्ही ब्रेक मिळणार आहे. एका रिऍलिटी शोमध्ये भन्साळी यांनी शांतनुला पाहिलं होतं आणि त्याला ऑफीसमध्ये बोलवून ही मोठी भूमिका ऑफर केली होती.   

alia bhatts shoot for ss rajamoulis rrr further delayed because of gangubai kathiawadi  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alia bhatts shoot for ss rajamoulis rrr further delayed because of gangubai kathiawadi