आजी नीतू कपूरनं ठेवलं नातीचं नाव, नावासोबत अर्थातही दडलंय सौंदर्य....Ranbir Daughter Name | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia-Ranbir Daughter Name

Alia-Ranbir Daughter Name: आजी नीतू कपूरनं ठेवलं नातीचं नाव, नावासोबत अर्थातही दडलंय सौंदर्य..

Alia-Ranbir Daughter Name: आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं आपल्या मुलीचं नाव खूपच सुंदर ठेवलं आहे. आलियाने आपल्या मुलीचं नाव सांगत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आलियानं सांगितलं आहे की त्यांच्या मुलीचं गोड नाव दुसरं-तिसरं कुणी नाही तर तिची आजी नीतू कपूरनं ठेवलं आहे. चला जाणून घेऊया आलिया आणि रणबीरच्या लाडक्या मुलीचं नाव आहे तरी काय?(Alia-Ranbir Daughter Name)

हेही वाचा: KBC14: केबीसीच्या मंचावरनं अमिताभचा विवाहीत पुरुषांना खास सल्ला; म्हणाले,'बायकोच्या बाबतीत कधीच...'

आलियानं एक पुसटसा फोटो शेअर केलाय,ज्यात रणबीर आणि तिच्यासोबत त्यांची मुलगी देखील आहे. मुलगी रणबीरच्या कुशीत दिसत आहे,जिच्या माथ्यावर रणबीर प्रेमानं हात फिरवताना दिसतो.. आलियानं या फोटोसोबत मुलीचं नाव देखील सांगितलं आहे.

आलियाने सांगितलं आहे की,''नाव 'राहा' आहे,जे तिच्या हुशार आजीनं अगदी निवडून ठेवलं आहे. ज्याचे खूप अर्थ आहेत. राहाचा अर्थ दिव्य ,आनंद,संस्कृतमध्ये कुळ, वंश, कुटुंब असा आहे. बंगाली भाषेत आराम,निवांत,विश्रांती असा होतो. अरेबिक मध्ये शांती आणि याव्यतिरिक्त स्वातंत्र्य आणि कल्याण असा देखील याचा अर्थ होतो. अगदी तिच्या नावासारखं आम्ही पहिल्या क्षणापासून हे सगळं अनुभवतोय''.

यासोबतच आलियानं लिहिलं आहे की, ''राहा तुझे आभारी आहोत आम्ही. आमच्या कुटुंबात तु आनंद आणला आहेस. असं वाटतंय की जसं आमचं आयुष्य आता कुठे सुरु झालंय. आलियाच्या या पोस्टवर सिनेइंडस्ट्रीतील अनेकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

आलिया आणि रणबीरनं १४ एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर जवळपास २ महिन्यानंतर आलियानं आई होणार असल्याची खुशखबर सर्व चाहत्यांना दिली होती. तर त्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी आलियानं क्यूट मुलीला जन्म दिला. तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांना प्रतिक्षा होती की ते आपल्या मुलीचं नाव नेमकं काय ठेवणार आहेत. तर आता राहा कपूर हे नावही लवकरच चर्चेत येणार हे ठरलेलं.