केबीसीच्या मंचावरनं अमिताभचा विवाहीत पुरुषांना खास सल्ला; म्हणाले,'बायकोच्या बाबतीत कधीच...' KBC14, Amitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KBC14: Amitabh Bachchan says men should never argue with their wives.

KBC14: केबीसीच्या मंचावरनं अमिताभचा विवाहीत पुरुषांना खास सल्ला; म्हणाले,'बायकोच्या बाबतीत कधीच...'

KBC14: 'कौन बनेगा करोडपती' शो प्रेक्षकांच्या आवडत्या रिअॅलिटी शो पैकी एक. याचा १४ वा सीझन सध्या सुरू आहे. अमिताभ बच्चन या शो मध्ये अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि करिअर संदर्भात अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. शो च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात त्यांनी एका स्पर्धकाला एक खास सल्ला देताना पाहिलं गेलं आणि लगोलग त्याची चर्चा सुरू झाली. (KBC14: Amitabh Bachchan says men should never argue with their wives.)

हेही वाचा: Bollywood: अन् जयाप्रदांनी दलीप ताहिल यांच्या सणसणीत कानाखाली मारली.., अनेक वर्षांनी अभिनेत्याचा खुलासा

बिरेन नावाच्या स्पर्धकाला बिग बी यांनी हा सल्ला दिला आहे. त्याचं झालं असं की, बिरेननं अमिताभना सांगितलं की त्यांनी आपल्या पत्नीसमोर एक अट ठेवली होती की जर का अमिताभ यांच्यासमोर हॉट सीटवर बसायची संधी त्यांना मिळाली तर पत्नीला ते म्हणतील तसं जेवण बनवावं लागेल. पण जर असं झालं नाही तर पत्नी जे बनवेल ते मुकाटपणे खाईन. बिरेन यांनी शो मध्ये ३ लाख २० हजार रुपये जिंकले. आणि सोबत पत्नीसमोर जी अट ठेवली होती ती देखील ते जिंकले. बिरेन यांनी त्यावेळी अमिताभना त्यांचीच पत्नी जया बच्चन यांचा व्हिडीओ दाखवला आणि यावरनं पुढचं सगळं रामायण घडलं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

गेल्या वर्षीचा केबीसी मधलाच तो व्हिडीओ होता. यात जया बच्चन सोबत श्वेता बच्चन आणि त्यांची मुलगी नव्या नंदा देखील होती. श्वेता आणि नव्या शो मध्ये पाहुण्या बनून आल्या होत्या. तेव्हा जया बच्चन यांनी एक व्हिडीओ मेसेज पाठवला होता. जया बच्चन यांचा व्हिडीओ पाहिल्यावर अमिताभ म्हणाले, ''सर ,पत्नीच्या बाबतीत जास्त अडून राहिलं नाही पाहिजे. जी ती म्हणेल ते गुपचूप ऐकून घ्यायला हवं''.

हेही वाचा: Pankaj Tripathi: साऊथ सिनेमाची ऑफर आली रे आली की पटकन नकार कळवतो पंकज त्रिपाठी; म्हणाला...

पुढे अमिताभ म्हणाले, ''ना मिले बैंगन,ना मिले भेंडी,या कोई आलू कोई बात नही....तुमच्यापेक्षा अधिक तुमची पत्नी तिच्या मुलासाठी काय योग्य हे एकआई म्हणून पाहत असते. त्याची जास्त काळजी घेताना दिसते. तिचं नेहमी आपल्या मुलावर,त्याच्या कुटुंबावर बारीक लक्ष असतं. त्यांच्यासाठी काय योग्य याचा ती विचार करत असते''. अमिताभच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाला अन् लगोलग त्याची चर्चा सुरू झाली.

हेही वाचा: Bollywood:अनुष्का-विराटचा बदलला मुंबईतील पत्ता; आता 'या' ठिकणी राहणार भाड्याने, महिन्याचं भाडं ऐकाल तर..

७ ऑगस्ट २०२२ रोजी 'कौन बनेगा करोडपती'चा १४ वा सिझन सुरु झाला होता. या शो मध्ये यंदाच्या सिझनला आतापर्यंत आमिर खान, मेरी कॉम, सुनील छेत्री पाहुणे म्हणून हजेरी लावून गेलेयत. याव्यतिरिक्त इतरही अनेक सेलिब्रिटींनी शो मध्ये उपस्थिती दर्शवली होती. २००० सालापासून सुरु झालेला केबीसी हा गेम शो गेली अनेक वर्ष आपलं राज्य कायम राखून आहे टी.व्ही च्या जगात.

हेही वाचा: Shehzada Trailer: अल्लू अर्जुन बनण्याच्या नादात पडली कार्तिकची विकेट, लोक म्हणू लागलेयत...

अमिताभ यांच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर अमिताभ बच्चन यांना नुकतंच आपण 'ऊंचाई' सिनेमात पाहिलं. या सिनेमात त्यांच्यासोबत नीना गुप्ता,अनुपम खेर, बोमन ईराणी आणि डॅनी होते. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या या सिनेमाला बऱ्यापैकी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.