Alibaba Aani Chalishitale Chor: आंबट-गोड थोडीशी तिखट, चाळीशीतली मस्ती "गॉसिप" सकट; "अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" चा ट्रेलर रिलीज

Alibaba Aani Chalishitale Chor: "अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Alibaba Aani Chalishitale Chor
Alibaba Aani Chalishitale Choresakal
Updated on

Alibaba Aani Chalishitale Chor: "अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" (Alibaba Aani Chalishitale Chor) या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. या चित्रपटातील 'तू साला कॅरेक्टर' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलं. हे गाणं पाहिल्यानंतर या चित्रपटाची कथा नेमकी कशी असणार? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. आता "अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये काही जोडप्यांमधील नात्यांची झलक बघायला मिळते.

अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला एक पार्टीमधील सीन दिसतो. या पार्टीमध्ये सर्वजण डान्स करत असतात. अशताच लाईट जाते आणि अंधारात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं चुंबन घेतो. आता हे चुंबन कुणी घेतलं आहे? हे कोणालाच माहित नसतं, त्यामुळे गोंधळ निर्माण होतो, असं ट्रेलरमध्ये दिसत आहे.

अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटाची कथा काही जोडप्यांवर आधारित आहे. पार्टीमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे या जोडप्यांच्या आयुष्यात कोण-कोणत्या गोष्टी घडतात, हे अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटाचा ट्रेलर उमेश कामतनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरला त्यानं कॅप्शन दिलं, "आंबट-गोड थोडीशी तिखट, चाळीशीतली मस्ती "गॉसिप" सकट... "अलीबाबा आणि चाळीशीतले चोर" २९ मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रात!"

पाहा ट्रेलर:

Alibaba Aani Chalishitale Chor
Alibaba Aani Chalishitale Chor : 'थोडा टाईट थोडा लूज, तू साला कॅरेक्टर'! 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर मधलं गाणं एकदा ऐकाच

चित्रपटाची स्टार कास्ट

सुबोध भावे, अतुल परचुरे, आनंद इंगळे, उमेश कामत, मुक्ता बर्वे, मधुरा वेलणकर-साटम, श्रुती मराठे या कलाकारांनी अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील या कलाकारांच्या डायलॉग्स आणि अभिनयानं लक्ष वेधलं आहे.

कधी रिलीज होणार चित्रपट?

29 मार्च रोजी अलीबाबा आणि चाळीशीतले चोर हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आदित्य इंगळेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Alibaba Aani Chalishitale Chor
Naach Ga Ghuma: "हा चित्रपट म्हणजे घर घर की कहानी"; परेश मोकाशींनी सांगितली 'नाच गं घुमा'ची पडद्यामागील गोष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com