esakal | कोरोना रुग्णांना एमजीएम रुग्णालयाचा आधार; जोपासली सामाजिक बांधिलकी
sakal

बोलून बातमी शोधा

mgm

कोरोनासारख्या वैश्विक महामारीच्या काळात मल्टिस्पेशालिटी म्हणवून घेणाऱ्या पंचतारांकित रुग्णालयांनी कोरोनाबाधितांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीतही एमजीएम रुग्णालय हाकेला साथ देत संकट काळात प्रशासनाच्या पाठिशी उभे राहिले आहे.

कोरोना रुग्णांना एमजीएम रुग्णालयाचा आधार; जोपासली सामाजिक बांधिलकी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : कोरोनासारख्या वैश्विक महामारीच्या काळात मल्टिस्पेशालिटी म्हणवून घेणाऱ्या पंचतारांकित रुग्णालयांनी कोरोनाबाधितांना दाखल करून घेण्यास नकार दिल्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीतही एमजीएम रुग्णालय हाकेला साथ देत संकट काळात प्रशासनाच्या पाठिशी उभे राहिले आहे. कामोठे आणि कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. 

वाचा ः मनसेचा बडा पदाधिकारी म्हणतोय "राऊतसाहेब... तर मी तुमच्या पाया पडेन", वाचा नक्की झालंय काय

रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी खासगी रुग्णालय म्हणून एकमेव असे एमजीएम समूह पुढे आले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात निःशुल्क उपचार केले जात आहेत. मुंबई, नवी मुंबई व ठाणे सारख्या शहरांतून येणाऱ्या रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. कोरोना रुग्णांसाठीच रुग्णालयाचा वापर व्हावा यासाठी पनवेल महापालिकेने एमजीएम रुग्णालयाला कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. त्याचे तंतोतंत पालन करित रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सुविधा, जेवण आणि औषधोपचार केला जात आहे. सध्या रुग्णालयात 250 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. लवकरच अतिरिक्त 100 खाटा आरक्षित केल्या जाणार आहेत. 

वाचा ः मुंबईकरांनो, तुमचा लाडका वडापाव तुमच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज...

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी 15 ते 20 वर्ष अनुभव असणारे तज्ज्ञ डॉक्टर्स, परिचारिका आणि निवासी डॉक्टरांचे पथक तैनात केले आहे. तसेच पनवेल महापालिका आणि संस्थेत झालेल्या करारानुसार आणखी 208 जणांचे पथक उपलब्ध केले जाणार आहे. पनवेल महापालिकेतर्फे रुग्णालयाला अद्यापपर्यंत एकाही रूपयांचे शुल्क न दिल्यानंतरही रुग्णालयाने रुग्णांची अविरतपणे सेवा कायम ठेवली आहे.  कोरोनाबाधित रुग्णांना श्वसानाचा त्रास होत असल्यामुळे अद्ययावत व्हेन्टिलेटर उपलब्ध केले आहेत. पनवेल महापालिकेने फक्त पाच व्हेन्टिलेटर रुग्णालयाला उपलब्ध केले होते. परंतु रुग्णांची संख्या पाहता रुग्णाने स्वतःच्या खर्चातून व्हेन्टिलेटर उभे केले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारामध्ये हेळसांड होऊ नये म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांसोबत रोजच्या रोज कामोठे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुधीरचंद्र कदम बैठक घेऊन चर्चा करीत असल्याची माहिती कामोठे एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. आर सल्गोत्रा यांनी सांगितले. 

वाचा ः मनसेची नवी मुंबईतल्या थायरोकेअर लॅबवर धडक; चुकीचे अहवाल येत असल्यामुळे घेतली आक्रमक भूमिका         

कोरोनाबाधित डॉक्टरांकडे विशेष लक्ष 
6 जूनपर्यंत रुग्णालयातील 12 डॉक्टर आणि 7 परिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. या डॉक्टर आणि परीचारिकांना आयसीएमआरच्या मार्गदर्शकेनुसार वेगवेगळ्या कक्षात विलगीकरण करून उपचार केले जात आहेत. त्यापैकी एक पॅथोलॉजी डॉक्टर आणि 7 परिचारिक कोरोनातून बरे झाल्यामुळे घरी पाठवण्यात आले आहे. तसेच उर्वरीत 11 डॉक्टरांना येत्या चार दिवसांत घरी सोडण्यात येणार आहे.

वाचा ः पहिल्याच दिवशी डोंबिवलीकरांचा कामावर 'लेट मार्क'! अपुऱ्या बससेवेमुळे गोंधळ

गर्भवती महिलांनाही सुविधा
कोरोनाच्या काळात सर्वाधिक हेळसांड गर्भवती महिलांची झाली आहे. परंतु कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयाने या काळात सुमारे 500 गर्भवती महिलांची यशस्वी प्रसूती केली आहे. त्यापैकी तीन कोरोनाबाधित महिलांचा समावेश होता. 8 जूनपर्यंत रुग्णालयातून 379 रुग्णांपैकी  274 रुग्णांना कोरोनातून बरे होऊन घरी पाठवले आहे. यात दीड दिवसाच्या नवजात बालक, दीड वर्षाचा मुलगा व 84 वर्षाच्या ज्येष्ठ नागरीकांचा समावेश आहे.

loading image