Amitabh Bachchan : अजूनपर्यत एकही रविवार चुकला नाही, बिग बींच्या डोळ्यात पाणी!

बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतरही तितक्याच उत्साहानं काम करताना दिसतात.
Amitabh Bachchan fans outside
Amitabh Bachchan fans outside esakal

Amitabh Bachchan fans outside the jalsa big b meets wearing project k : बॉलीवूडचे शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यानंतरही तितक्याच उत्साहानं काम करताना दिसतात. त्यांच्या त्या फिटनेसचे अनेकांना कौतूक आहे. नवोदित कलाकारांना तर अमिताभ यांच्या फिटनेसनं भुरळ घातली आहे. त्यांना कोड्यात टाकले आहे.

सध्या सोशल मीडियावर अमिताभ यांच्या जलसा बंगल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात बिग बी हे त्यांच्या घराबाहेर उभे राहून शेकडो चाहत्यांच्या अभिनंदनाचा स्विकार करताना दिसत आहे. त्या फोटोंमध्ये जलसा बाहेर एवढी गर्दी का झाली आहे असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी विचारला आहे. अमिताभ हे सध्या त्यांच्या प्रोजेक्ट के नावाच्या फिल्ममध्ये व्यस्त आहेत.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

याशिवाय अमिताभ हे त्यांच्या लोकप्रिय अशा कौन बनेगा करोडपती नावाच्या कार्यक्रमामध्ये देखील दिसणार आहेत. त्यावरुन त्यांची लोकप्रियतेची आणखी चर्चाही होणार आहे. गेल्या १० वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या मालिकेनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आगळा वेगळा विक्रम या मालिकेनं आपल्या नावावर केला आहे. बिग बी दर रविवारी त्यांच्या घराबाहेर चाहत्यांना भेटण्यासाठी येतात. मात्र या रविवारची गोष्ट जरा वेगळी होती.

Amitabh Bachchan fans outside
Shah Rukh Khan Movie : बॉलीवूडमधला सगळ्यात महागडा अभिनेता! एका चित्रपटाचे राईट्स तो...

बच्चन यांनी ती गर्दी पाहिल्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओनंतर ते भावूक झाल्याचे दिसून आले आहे. अमिताभ यांनी न चुकता चाहत्यांना धन्यवाद दिले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना मनसोक्तपणे फोटोही काढून दिले आहेत. बिग बी यांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षाही दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये कित्येक लोक अमिताभ यांचे पोस्टर घेऊन त्यांच्या स्वागतासाठी उभे असल्याचे दिसून आले आहे.

तो व्हिडिओ शेयर करताना बिग बी यांनी लिहिले आहे की, प्रेम म्हणजे काय असते हे या लोकांना पाहून कळते. लोकं मला भेटायला येतात यासारखं सुख नाही. ते मला भेटतात याचा खूपच आनंद आहे. त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांचे हे प्रेम असेच राहू द्यावे. ही त्यांना प्रेमळ विनंती. अशी पोस्ट बिग बी यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com