Allu Arjun Controversy : 'अरे कोण आहे तो यश'? केजीएफचा यश अन् अल्लु अर्जूनच्या वादात पुष्पाच्या वडिलांची उडी!

साऊथ इंडस्ट्रीतील त्या सुपरस्टार मध्ये आता मोठ्या प्रमाणात वादाला सुरुवात झाली आहे.
Allu Arjun Father Arvind Shocking statment KGF yash
Allu Arjun Father Arvind Shocking statment KGF yash esakal

Allu Arjun Father Arvind Shocking statment KGF yash : साऊथ इंडस्ट्रीतील त्या सुपरस्टार मध्ये आता मोठ्या प्रमाणात वादाला सुरुवात झाली आहे. तो वाद त्या दोन अभिनेत्यांमध्ये नसून त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. केजीएफ चित्रपटातून तुफान लोकप्रिय झालेला यश आणि पुष्पा फेम सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या चाहत्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाद होतो आहे.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अल्लूनं साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत अल्लुच्या नावाचा समावेश आहे. त्याचा दोन वर्षांपूर्वी पुष्पा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक अन् चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत.

यशच्या बाबत बोलायचे झाल्यास केजीएफ चित्रपटानं प्रेक्षकांना वेडं केलं होतं. त्यानंतर आता तो दुसऱ्या एका प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात रामायणावर आधारित चित्रपटामध्ये तो रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपासून यश आणि अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरु झाला आहे. त्या वादात अखेर अल्लू अर्जूनच्या वडिलांना उडी घ्यावी लागली आहे.

अल्लू अर्जूनचे वडील अऱविंद म्हणाले की, केजीएफच्या चित्रिकरणात सर्वाधिक पैसा ओतला गेला. त्याचे दुसरे कारण त्या चित्रपटाचा अभिनेता त्यानं सर्वाधिक मानधन घेतले. चित्रपट काय फक्त त्याच्या एकट्यामुळेच यशस्वी झालेला नाही. त्यात बाकीच्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. निर्मात्यांनी केलेल्या अफाट खर्चामुळेच तो चित्रपट भव्य दिव्य झाला हे विसरता येणार नाही. कोण होता तो अभिनेता?

यावेळी अरविंद यांनी कोण आहे तो यश...अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या पत्रकार परिषदेनंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्या चर्चेला उधाण आले आहे. जोपर्यत केजीएफ प्रदर्शित झाला नव्हता त्यापूर्वी यश कोण होता हे माहिती आहे का, त्या चित्रपटानं एवढी कमाई कशी काय केली, काय होतं त्यात इतकं, असे प्रश्न अरविंद यांनी यावेळी उपस्थित केले होते.

Allu Arjun Father Arvind Shocking statment KGF yash
Mumbai Local Viral Video: सुरक्षेची ऐशी तैशी; ३ रीलबहाद्दर तरुणांनी लोकलमध्येच घालवले २४ तास

अरविंद यांच्या त्या बोलण्यामुळे केजीएफच्या चाहत्यांना मात्र राग अनावर झाला आहे. त्यांनी अरविंद यांच्यावर देखील टीका केली आहे. सोशल मीडियावर त्याला वेगळ्या अर्थानं चर्चेला सुरुवात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com