अल्लू अर्जुनआता सिनेमा निवडताना सर्वप्रथम 'या' गोष्टीचा विचार करणार Allu Arjun | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allu Arjun

अल्लू अर्जुन आता सिनेमा निवडताना सर्वप्रथम 'या' गोष्टीचा विचार करणार

अल्लू अर्जुन(Allu Arjun) हा खरंतर साऊथचा सुपरस्टार. तिथे घराघरात त्याचे चाहते आहेत. पण त्याचा 'पुष्पा' सिेनमा हिंदी भाषेत प्रदर्शित झाला अन् बॉलीवूडचे सिनेमे मोठ्या आवडीने पाहणाऱ्या चाहत्यांनाही त्यानं आपलं वेड लावलं. 'पुष्पा' सिनेमातील त्याच्या प्रत्येक संवादानं,संवादफेकीनं चाहत्यांची वाहवा मिळवली. सोशल मीडियावर तर त्याच्या 'पुष्पा' सिनेमातील संवादाची हुबेहूब नकल केलेल्या व्हिडीओ पोस्टचा नुसता पाऊस पडतोय. इतक्या दिवसांनंतरही त्याच्या चाहत्यांचा उत्साह काही कमी झालेला दिसत नाही. सिनेमात त्याची आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री उत्तम रंगली आहे. सर्वांनीच या जोडीला मनापासून पसंत केलं आहे. आता 'पुष्पा' सिनेमाचा सीक्वेल करण्यात अल्लू अर्जुन व्यस्त असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा: ''मी जिंकू नये म्हणून प्रयत्न केले''तेजस्वी प्रकाशचा मोठा खुलासा

पण आता अल्लू अर्जुनने सिनेमा निवडताना काही गोष्टींचा आपण प्राधान्याने विचार करू असं म्हटलेलं आहे. तो आपल्या एका मुलाखतीत म्हणाला की,''आता मी सिनेमा निवडताना खूप सजग होणार आहे. माझा सिनेमा हा लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सर्वांनी एन्जॉय केला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. म्हणूनच माझ्या सिनेमात मी असा कोणताही सीन करणार नाही जो एक कुटुंब एकत्र बसून पाहू शकत नाही''. आता हा जरा मोठाच निर्णय ठरेल नाही का अल्लू अर्जुनसाठी. त्याच्या या निर्णयामुळे निर्माते मात्र अडचणीत आल्याचं बोललं जात आहे. आता जर लहान मुलं ते वयस्कर माणसं अशा सर्वांनीच एकत्र बसून सिनेमा एन्जॉय केला पाहिजे अशी अल्लू अर्जुनने अट ठेवली तर सिनेमातील कोणकोणते सीन काढून टाकावे लागतील याची मोठी लिस्ट बनेल. बरं,त्या सीनवरच तर सिनेमे चालतात. पण आता काय,अल्लूच्या नावावर सिनेमे चालतात,त्यात 'पुष्पा'मुळे जरा जास्तच त्याची चाहत्यांमध्ये क्रेझ. मग निर्मात्यांना त्याच्या अटी लक्षात घेऊनच सिनेमा करावा लागणार नाही का.

Web Title: Allu Arjun Pushpa Star Interview About Selection Of Movie Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top