''मी जिंकू नये म्हणून प्रयत्न केले''तेजस्वी प्रकाशचा मोठा खुलासा Tejasswi Prakash | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss 15 WInner Tejasswi Prakash

''मी जिंकू नये म्हणून प्रयत्न केले''तेजस्वी प्रकाशचा मोठा खुलासा

छोटया पडद्यावरचा सर्वात चर्चित आणि वादात राहिलेला शो म्हणजे 'बिग बॉस'(Big boss). 'बिग बॉस सिझन १५' नुकताच संपला आहे. या शो चा अंतिम सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या वेळी सादर करण्यात आलेल्या परफॉर्मन्सेसनी पाहणाऱ्यांची मनं जिंकली. आणि अखेर ती वेळ आली ज्याची गेल्या चार महिन्यांपासून सगळेच प्रतिक्षा पाहत होते. या सिझनची विनर ठरली तेजस्वी प्रकाश(Tejasswi Prakash). तेजस्वीला शो च्या ट्रॉफीसोबतच ४० लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले. तेजस्वीला विजेती म्हणून घोषित केल्यानंतर मात्र खूप मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जिथे तेजस्वी विजेती ठरली म्हणून तिचे चाहते खूप खुश आहेत तिथे दुसरीकडे काहीजणांनी मात्र तिच्या विजेती होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. काहीजणं नाराज झालेलेही दिसून आले आहेत.े

Winner Tejasswi Prakash,salman Khan,Prateek Sehajpal

Winner Tejasswi Prakash,salman Khan,Prateek Sehajpal

इतकंच काय तर तेजस्वीला विजेती म्हणून घोषित केल्यानंतर छोट्या पडद्यावरच्या काही सेलिब्रिटींनीही तिच्या विजेती होण्यावर नाराजगी व्यक्त केली आहे. आता खुद्द तेजस्वी प्रकाशने बिग बॉसची ट्रॉफी पटकावल्यानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. शमिता शेट्टी,प्रतिक सहजपाल,करण कुंद्रा सारख्या स्ट्रॉंग स्पर्धकांना मात देत विजयाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणारी तेजस्वी आपल्या यशावर खूप खूश आहे. ती म्हणाली,''या शो मधील कोणालाच मी जिंकू नये असे वाटत होते. बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर मी जेव्हा माझा प्रवास मागे वळून पाहिला तेव्हा माझ्या लक्षात आलं की कोण माझ्या विरोधात काय करत होते''.

हेही वाचा: कंगनानं नवाजुद्दिन सिद्दिकीचा तो फोटो पोस्ट केला अन्...

''मी जिंकू नये म्हणून काय काय क्लृप्त्या लढवल्या गेल्या हे मी सारं आता पाहिलं. मला माहित आहे,शेवटच्या क्षणापर्यंत मी जेव्हा तिथे बिग बॉसच्या मंचावर होते त्या क्षणीही तिथे उपस्थित कोणालाच मी जिंकू नये असं वाटत होतं. मी जिंकू नये म्हणून लोकं प्रार्थना करत होते. पण गणपती बाप्पा आणि माझ्या चाहत्यांना मात्र मी विजेती बनलेलं पहायचं होतं. माझा विश्वास आहे की ज्याचं कुणी नसतं त्याच्यासोबत नेहमी देव असतो. मी मेहनतीने यश मिळवलं आहे. मला यासाठी जिंकवलं नाही की या वाहिनीवरचाच 'नागिन ६'' हा शो मी करणार आहे. हो,तेजस्वी कलर्स वाहिनीवर पुन्हा आपल्याला एकता कपूरच्या 'नागिन ६' या मालिकेत दिसणार आहे. 'बिग बॉस १५' च्या सिझनमध्ये प्रतिक सहजपालनं शेवटपर्यंत तेजस्वीला कांटे की टक्कर दिली. प्रतिक या शो चा उपविजेता ठरला आहे.

Web Title: Tejasswi Prakash First Interview Out Bigg Boss 15 Winner Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top