Amaltash Movie Review: सुरेल संगीताची जमलेली मैफल

Amaltash Movie Review
Amaltash Movie Reviewsakal

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडेने ‘मी वसंतराव’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट २०२२मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आता राहुलचा ‘अमलताश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. लेखक व दिग्दर्शक सुहास देसले यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हळूवार आणि सुमधुर असे संगीत, त्यातच दोन जिवांची जमणारी घट्ट मैत्री आणि त्यातून फुलणारे प्रेमाचे बंध अशा एकूणच संगीताच्या सुरेल प्रवासाची ही कथा आहे.

Amaltash Movie Review
Article 370 Movie Review : आर्टिकल 370 पाहिल्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितला review, यामी गौतमच्या अभिनयाबद्दल सांगितलं असं काही..

या चित्रपटात संगीताचे वेड, तसेच संगीताचा ध्यास असणाऱ्या एका कलाकाराच्या आयुष्यातील विविध टप्पे, त्याच्या जीवनातील चढ-उतार उत्तमरीत्या गुंफण्यात आले आहेत. राहुल (राहुल देशपांडे) आणि कीर्ती (पल्लवी परांजपे) यांची ही कथा आहे. पल्लवी कॅनडातून आपल्या आजीकडे आलेली असते. तिला संगीताची आवड असते. राहुल आपली बहीण दीपा (दीपा माटे), तिचा पती (भूषण माटे) आणि भाची डिंपल (त्रिशा कुंटे) यांच्यासह राहात असतो.

राहुलला संगीताची भारी आवड असते. राहुल, त्याचा मित्र पवन आणि अन्य दोन मित्र यांचा एक म्युझिकल बॅण्ड असतो. मात्र, आता काही कारणास्तव तो सध्या बंद अवस्थेत असल्यामुळे राहुल आणि त्याचा मित्र पवन एक म्युझिकल शॉप चालवीत असतात. तेथे वाद्यांची दुरुस्ती व देखभाल केली जाते. अशातच एका वाद्याच्या कामाच्या निमित्ताने राहुल श्रीमती पोतदार (प्रतिभा पाध्ये) यांच्या घरी जातो. तेथे त्याची ओळख कीर्तीशी होते. दोघांनाही संगीताची आवड असल्यामुळे त्यांचे सूर जुळतात. त्यांच्यामध्ये छान मैत्री होते आणि हे मैत्रीचे बंध प्रेमात हळूहळू गुंफले जातात. मग त्यानंतर नेमके काय होते हे प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेले बरे.

Amaltash Movie Review
Shivrayancha Chhava Movie Review: छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? अंगावर उभे राहतील रोमांच

लेखक व दिग्दर्शक सुहास देसले यांनी ही कथा उत्तम विणलेली आहे. फ्रेम टू फ्रेम त्यांनी सुंदररीत्या चित्रित केली आहे. संगीतामधून त्यांनी ही कथा उत्तम खुलविली आहे. वास्तविक वाटावी अशी ही कथा आहे आणि त्याला राहुल देशपांडे, पल्लवी परांजपे, प्रतिभा पाध्ये, दीप्ती माटे, त्रिशा कुंटे आदी कलाकारांनी आपल्या सकस अभिनयाने उत्तम साथ दिली आहे. राहुल आणि पल्लवी यांची पडद्यावरील केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे.

त्यांनी आपल्या मनातील भावभावना, मैत्री सुंदररीत्या पडद्यावर खुलविली आहे. विशेष बाब म्हणजे, एकीकडे कीर्तीबरोबर असलेली मैत्री तर दुसरीकडे बहिणीचे कुटुंब आणि त्याचे मित्र असे भूमिकेचे बेअरिंग छान पेलले आहे. राहुल शास्त्रीय गायक आहेच, त्याचबरोबर उत्तम अभिनेता आहे हे या भूमिकेतून सिद्ध होते. पल्लवी परांजपेने कमालीचा अभिनय केला आहे.

Amaltash Movie Review
Sridevi Prasanna Movie Review : लग्न करायला जाताय, 'श्रीदेवी प्रसन्न' पाहून गेलात तर 'एवढे गुण' नक्की जुळतील!

दीप्ती माटे यांनीदेखील छान काम केले आहे. बहीण आणि भाऊ यांच्यातील संवाद दिग्दर्शकाने छान टिपले आहेत. कलाकारांच्या अभिनयाबरोबरच संगीत या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावते. त्याबद्दल संगीतकार भूषण माटे यांचे कौतुक करावे लागेल. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी छान झाली आहे. चित्रपटाची सुरुवात काहीशी संथ असली, तरी एकूणच कथानक आणि त्याची मांडणी उत्तम झाली आहे. एकूणच सुरेल संगीताची ही मैफल उत्तम जमली आहे.

Amaltash Movie Review
Salaar Movie Review: प्रभासच्या करिअरच्या बुडत्या नावेला 'सालार' तारणार! कसा आहे सालार? वाचा रिव्ह्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com