'निथळत्या राती' हा रोमॅंटिक म्युझिक अल्बम लवकरच भेटीला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

अतिशय रोमँटिक असे गाणे तुम्हाला सहज ठेका धरायला लावते आणि तेवढीच रोमँटिक दृश्यनिर्मिती केली आहे 'तुला पहाते रे' या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत लता गायकवाड यांनी केली आहे.

एएमई या म्युझिक कंपनीकडून या दीपावलीला प्रेक्षकांना एक छानशी म्युझिक ट्रीट मिळणार आहे. गायिका आनंदी जोशी, संगीत शशांक प्रतापवार, गीतकार साहस साखरे यांच्या उत्तम साथीने या गीतांची निर्मिती झाली आहे.

अतिशय रोमँटिक असे गाणे तुम्हाला सहज ठेका धरायला लावते आणि तेवढीच रोमँटिक दृश्यनिर्मिती केली आहे 'तुला पहाते रे' या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक चंद्रकांत लता गायकवाड यांनी केली आहे. अतिशय भावणारे आणि तितकेच नयनरम्य चित्र त्यांनी सहजतेने आपल्या दिग्दर्शक प्रतिभेने उभे केले आहे आणि या सगळ्याला मोलाची साथ लाभली ती कलाकार मालविका गायकवाड (मुळशी पॅटर्न फेम) आणि संकेत लोंढे यांची.

सोशल मीडियामधील प्रोमो बघून याची कल्पना तुम्हाला नक्की येईल. आर्मी मधील एका सैनिकाची  romantic स्टोरी सुंदर पद्धतीने गुंफली आहे. गुहागर, दाभोळ या कोकणातील नयनरम्य परिसरात याचे चित्रीकरण झाले आहे. 25 ऑक्टोबरला दीपावलीच्या मुहूर्तावर हा अल्बम रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AME music company launched new music album