Ameesha Patel : गदरची 'सकीना' आली, फोटोग्राफर्सचे डोळे दिपले! नुसता लखलखाट

अमिषाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून सकीना फेम अमिषा पटेल चर्चेत आली आहे.
Ameesha Patel spotted on Airport viral Video social
Ameesha Patel spotted on Airport viral Video social esakal

Ameesha Patel Video : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल सध्या वेगळ्याच आनंदात आहे. तिच्या यापूर्वी व्हायरल झालेल्या लूक्सला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. येत्या काही महिन्यात तिचा गदर २ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अमिषाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या काही दिवसांपासून सकीना फेम अमिषा पटेल चर्चेत आली आहे. यापूर्वी तिच्या कहो ना प्यार है चित्रपटाचा अपवाद वगळता तिच्या वाट्याला फारशी लोकप्रियता आली नाही. डझनभर चित्रपट अमिषानं केले पण त्यातही तिनं प्रेक्षकांपुढे स्वताच्या नावाचा वेगळा ठसा काही उमटवलेला दिसत नाही. मात्र जेव्हा तिचा गदर प्रदर्शित झाला त्यात तिनं कमाल केली. तो चित्रपट प्रेक्षकांना कमालीचा आवडला होता.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अमिषाच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे. अमिषा पापाराझ्झींनाच विचारते की, माझ्या आगामी चित्रपटाच्याबाबत तुमचे काय म्हणणे आहे. त्यावर तो पापाराझ्झी म्हणतो की, मॅडम तुमचा चित्रपट हा ब्लॉकबस्टर होणार आहे. तुम्ही काळजी करु नका. यावर अमिषानं त्याला हसून दाद दिली आहे. अमिषाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

अमिषा पटेलच्या गदर २ या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणा आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होते. प्रेक्षकांना गदरमधील तारा सिंह आणि सकीना यांच्याविषयी नव्यानं सांगण्याची गरज नाही. पहिल्या भागामध्ये त्यांच्या अभिनयानं प्रेक्षक भारावून गेले होते. आता देखील दुसऱ्या चित्रपटाचे प्रेक्षकांना वेध लागले आहेत.

Ameesha Patel spotted on Airport viral Video social
Ameesha Patel : 'गदर' फेम अमिषाचा अवतार पाहिलात का?

अनिल शर्मा यांनी गदर २ चे दिग्दर्शन केले असून पहिल्या चित्रपटाला त्यांनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. काही दिवसांपूर्वी गदरचा टीझर व्हायरल झाला होता. त्यावरुन प्रेक्षकांना या चित्रपटाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होतो याची उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Ameesha Patel spotted on Airport viral Video social
Sharvari Wagh : शेवटी शर्वरी जिंकलीच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com