अमेयची बॉयगिरी 

संकलन : चिन्मयी खरे
मंगळवार, 14 मार्च 2017

"दिल दोस्ती दुनियादारी' आणि "दिल दोस्ती दोबारा' या जरा हटके असणाऱ्या मालिका. आणि "भाडिपा'च्या "कास्टिंग काऊच'सारख्या वेबसीरिजमधून दिसणारा अमेय वाघ. आता नवीन वेबसीरिज घेऊन येतोय. एकता कपूर ही सासू सूनेच्या कौटुंबिक मालिकांसाठी प्रसिद्ध आहे. पण आता ती अशीच जरा हटके विषय असलेली "बॉयगिरी' ही वेबसिरीज घेऊन येतेय. "बॉयगिरी- मेन विल बी बॉईज' या नावातच सगळं आलं. मुलांमध्ये असलेली मैत्री, त्यांची मैत्रीची व्यक्त होण्याची वेगळीच गंमतीशीर भाषा यावर ही मालिका बेतली आहे. "मॅन नेव्हर ग्रो अप' या तत्त्वावर दिसणारं खेळकर, खोडकर वागणं हे सगळं पाहिल्यावर मुलांना त्यांचे तरुणपणीचे दिवस नक्कीच आठवतील.

"दिल दोस्ती दुनियादारी' आणि "दिल दोस्ती दोबारा' या जरा हटके असणाऱ्या मालिका. आणि "भाडिपा'च्या "कास्टिंग काऊच'सारख्या वेबसीरिजमधून दिसणारा अमेय वाघ. आता नवीन वेबसीरिज घेऊन येतोय. एकता कपूर ही सासू सूनेच्या कौटुंबिक मालिकांसाठी प्रसिद्ध आहे. पण आता ती अशीच जरा हटके विषय असलेली "बॉयगिरी' ही वेबसिरीज घेऊन येतेय. "बॉयगिरी- मेन विल बी बॉईज' या नावातच सगळं आलं. मुलांमध्ये असलेली मैत्री, त्यांची मैत्रीची व्यक्त होण्याची वेगळीच गंमतीशीर भाषा यावर ही मालिका बेतली आहे. "मॅन नेव्हर ग्रो अप' या तत्त्वावर दिसणारं खेळकर, खोडकर वागणं हे सगळं पाहिल्यावर मुलांना त्यांचे तरुणपणीचे दिवस नक्कीच आठवतील. अमेय वाघ या मालिकेत खोडकर मुलाची भूमिका करतोय. अमेय याबद्दल बोलतो, "या मालिकेतली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खऱ्या आयुष्यातील काही जवळचे मित्र या मालिकेसाठी एकत्र आले आहेत. बॉयगिरी ही मालिका ब्रोमान्सला एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवेल. मी बज्जूच्या भूमिकेत दिसणार आहे. तो सगळ्यात मोठ्ठा जुगाडू आहे आणि तुम्हाला मदतीची गरज नसेल तरीही तो तुमच्या मदतीला तत्पर असतो.' अशी ही बॉयगिरी तमाम बॉईजना आपल्या लाईफचे प्रतिबिंब दाखवील, हे नक्की. 

Web Title: Amey wagh new webseries