'कौन बनेगा..' आजपासून प्रत्येक घरात 'बिग बी' अवतरणार!

टीम ई सकाळ
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

अनेक वर्षं सातत्याने हा शो भारतातीलच नव्हे, तर जगभरातील भारतीयांचे मनोरंजन करतो आहे. मोठ्या पडद्यावर शहनशाह असलेल्या अमिताभ बच्चन यांनी छोटा पडद्याचेही आपण सम्राट असल्याचे दाखवून दिले ते याच शोमधून. कौन बनेगा करोडपती या शो ने सर्वांना वेड लावले. अनेकांना कोट्यधीश बनवले. याच शोचा नववा सीझन आजपासून येतोय. रात्री 9 वाजता पुन्हा एकदा बिग बी यांचा खर्जातला आपुलकीचा आवाज प्रत्येक भारतीयाला साद घालणार आहे. 

मुंबई : अनेक वर्षं सातत्याने हा शो भारतातीलच नव्हे, तर जगभरातील भारतीयांचे मनोरंजन करतो आहे. मोठ्या पडद्यावर शहनशाह असलेल्या अमिताभ बच्चन यांनी छोटा पडद्याचेही आपण सम्राट असल्याचे दाखवून दिले ते याच शोमधून. कौन बनेगा करोडपती या शो ने सर्वांना वेड लावले. अनेकांना कोट्यधीश बनवले. याच शोचा नववा सीझन आजपासून येतोय. रात्री 9 वाजता पुन्हा एकदा बिग बी यांचा खर्जातला आपुलकीचा आवाज प्रत्येक भारतीयाला साद घालणार आहे. 

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या या प्रत्येक शोला रसिकांनी उचलून धरले. काही काळ हा शो शाहरूख खाननेही केला. पण त्याला तितके यश आले नाही. अमिताभ यांचा जनमानसावर असलेला प्रभाव, त्यांच्या व्यक्तिमत्वाची असलेली भव्यता आणि त्याचवेळी बोलण्यातले मार्दव प्रत्येकाला वेडे करून गेले. लोकांची पसंती लक्षात घेऊन हा शो आता पुन्हा येतो आहे. या नव्या शोमध्ये लाईफ लाईन असतील, पण बदलत्या तंत्राचा आधार घेत फोन अ फ्रेंड ही संकल्पना जाऊन आता त्याजागी व्हिडोओ अ फ्रेंड हा प्रकार आला आहे. शिवाय 7 कोटीचा जॅकपाॅटही यात असणार आहे. महत्वाची बाब अशी की आपल्या जोडीदारासोबत स्पर्धकाला हा खेळ खेळता येणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून या शोची टिजर लिंक दिली होती. अभिषेक बच्चननेही या लिंकला रिट्विट करतानाच अब जवाब देने का वक्त आ गया है असे सांगितले होते. रात्री 9 वाजता सोनी वाहिनीवर हा शो लागणार आहे. 

Web Title: Amitabh Bachchan 9th season of Kaun Banega Crorepati esakal news