Amitabh Bachchan : नातवाच्या कौतुकासाठी अमिताभ यांनी वापरला ऑक्सफर्ड डिक्शनरीतील 'तो' खास शब्द

प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तर च्या द आर्चीजची जोरदार चर्चा सुरु आहे.
Amitabh Bachchan comment on grandson Agastya You are rizz
Amitabh Bachchan comment on grandson Agastya You are rizzesakal

Amitabh Bachchan comment on grandson Agastya You are rizz : प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तर च्या द आर्चीजची जोरदार चर्चा सुरु आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट आता प्रदर्शित झाला असून काल त्याच्या झालेल्या प्रीमिअरला बिग बी अमिताभ बच्चन ते ऋतिक रोशन पर्यत अनेक सेलिब्रेटी हजर होते.

किंग खान शाहरुखची लेक सुहाना खान, श्रीदेवी अन् बोनी कपूर यांची धाकटी लेक खुशी कपूर अन् बिग बी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं आहे. ज्याची जोरदार चर्चा आहे. काल मुंबईत झालेल्या प्रीमिअरला आपल्या मुलीचा, नातवाचा आणि बाकी इतर कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. Amitabh Bachchan comment on grandson Agastya You are rizz The Archies Movie

सध्या सोशल मीडियावर जया बच्चन, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, श्वेता बच्चन आणि तिचा परिवार या सगळ्यांचे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यात अमिताभ यांनी आपल्या लाडक्या नातवासोबत शेयर केलेला तो फोटो देखील खास प्रतिक्रियेचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

अमिताभ बच्चन यांनी अगस्त्याचे कौतुक करताना ऑक्सफर्डच्या डिक्शनरीतील रिझ नावाचा शब्द वापरला आहे. जो ऑक्सफर्डनं यावर्षीचा शब्द म्हणून जाहीर केला आहे. ज्याचा अर्थ सर्वात सुंदर, मोहित करणारा, आकर्षक, उत्साही, रुबाबदार असा आहे. गेल्या काही दिवसांपासून या शब्दाची खूपच चर्चा आहे. त्यावरुन वेगवेगळ्या पोस्ट अनेकांनी व्हायरल केल्या आहेत.

केवळ बिग बी च नाही तर अनेक प्रसिद्ध लेखक, कवी, अभिनेते यांनी यापूर्वी या शब्दाचा वापर करुन त्याचे महत्व अधोरेखित केले आहे. २०२३ या वर्षातला सर्वोत्तम शब्दाचा मानकरी 'रिज' या शब्दाकडे गेला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे.

अमिताभ यांनी अगस्त्यचं कौतुक करताना यु आर रिझ असे म्हटले आहे. त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देऊन त्याचे अभिनंदन केले आहे. त्याच्या आगामी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी अभिषेक बच्चन आणि अगस्त्यसोबत शेयर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com