अमिताभ बच्चन आणि एकता कपूर यांच्या घरी 'या' कारणामुळे यंदा साजरी होणार नाही दिवाळी

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 4 November 2020

बॉलीवूडमध्येही अनेक बड्या सेलिब्रिटींच्या घरी दिवाळीनिमित्त खास पार्टी आयोजित केली जाते मात्र या वर्षी इतर सणांप्रमाणेच दिवाळी साजरी करण्यावरही अनेक मर्यादा आल्या आहेत.

मुंबई- कोरोनाच्या संसर्गामुळे या वर्षी अनेक सणांवर विरजण पडलं. दिवाळी हा सण तर प्रत्येकाचा आनंदाचा सण आहे. बॉलीवूडमध्येही अनेक बड्या सेलिब्रिटींच्या घरी दिवाळीनिमित्त खास पार्टी आयोजित केली जाते मात्र या वर्षी इतर सणांप्रमाणेच दिवाळी साजरी करण्यावरही अनेक मर्यादा आल्या आहेत. बॉलीवूडचे असे काही सेलिब्रिटी आहेत जे दरवर्षी दिवाळी निमित्त पार्टीचं आयोदन करतात. यातलंच एक मोठं नाव म्हणजे  बिग बी अमिताभ बच्चन.

हे ही वाचा: हिना खानने सहा महिन्यातंच गाठला १ कोटी फॉलोअर्सचा टप्पा, पार्टीचे फोटो व्हायरल

बिग बींच्या घरी दिवाळी निमित्त दिली जाणारी पार्टी हा दरवर्षी उत्सुकतेचा विषय असतो पण यंदा बिग बी यांच्या घरी दिवाळी साजरी केली जाणार नाही. बिग बींसोबतंच टीव्ही मालिकांची क्वीन एकता कपूर हिच्या कडेही यंदा दिवाळी पार्टी होणार नसल्याची माहिती प्रसिद्द वृत्तपत्राने दिली आहे.. यंदाच्या वर्षी कोरोना साथीमुळे दिवाळीचा जोश नेहमीप्रमाणे दिसत नसतानाचा बॉलीवूडदेखील दिवाळीच्या मूड मध्ये नसल्याचं चित्र दिसत आहे. लॉकडाऊनमुळे नवे सिनेमे रिलीज होऊ शकलेले नाहीत. थिएटर सुरु झाली तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद नाही शिवाय देशभर कोरोनाचे सावट अजूनही आहेच.

बिग बी आणि एकता कपूर यांच्याकडे यंदा दिवाळी साजरी न करण्याचे कारण म्हणजे बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन. ऋषी कपूर आणि बिग बी चांगले मित्र होते शिवाय बिग बींची मुलगी श्वेता हिचं लग्न ऋषी कपूर यांचा भाचा निखिल नंदा यांच्यासोबत झालं असल्याने त्यांचं नातं आहे. त्यामुळे यंदा बिग बी यांच्याकडे दिवाळी नाही. एकता कपूरनेही ऋषी कपूर आणि तिचे वडील जितेंद्र हे जवळचे मित्र होते आणि दोन्ही कुटुंबातील नाते सलोख्याचे होते त्यामुळे दर वर्षी दिली जाणारी दिवाळी पार्टी यंदा रद्द केली आहे.
शिवाय बच्चन कुटुंबातील अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि नात आराध्या यांना कोरोना संसर्ग झाला होता त्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. या कारणामुळेही बच्चन कुटुंबात यंदा सण साजरा केला जाणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

amitabh bachchan ekta kapoor cancel star studded diwali bash due to this reason  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan ekta kapoor cancel star studded diwali bash due to this reason