'छातीत दुखतंय...'अमिताभ यांच्या 'त्या' ट्वीटनं चाहत्यांची उडवली झोप

अमिताभ यांनी स्वतः ट्वीटरवर यासंदर्भात स्पष्टिकरण दिलं आहे.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanGoogle

अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळतात.ते नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि सिनेमांविषयी त्यांच्या चाहत्यांना अपडेट देत असतात. पण त्यांच्या संदर्भातल्या एका ट्वीटवरुन सध्या भलताच गोंधळ उडाला आहे. त्या ट्वीटवर अमिताभ यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांच्याविषयी काळजी,चिंता व्यक्त केली आहे. पण यामुळे स्वतः अमिताभ यांनी पुढे येऊन ट्वीटविषयीचा खुलासा आणि लोकांमध्ये पसरलेला गैरसमज दूर करणारी एक पोस्ट पुन्हा ट्वीटरवर केली आहे. अमिताभ यांच्याविषयीचं चाहत्यांमध्ये अफवा पसरवणारं ट्वीट कुणी केलं होतं नेमकं?

Amitabh Bachchan
अभिषेक-राणी मधील 'ते' नातं प्रियंकाला माहित होतं म्हणूनच...

तर सर्वप्रथम आम्ही स्पष्ट करतो की,स्वतः अमिताभ यांनी केलेल्या एका ट्वीटमुळेच त्यांच्या तब्येती विषयीच्या चुकीच्या बातम्या पसरल्या. त्यांचे चाहते घाबरले आणि अनेकांनी त्यांच्याविषयी काळजी व्यक्त करीत ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून केली. काय लिहिलं होतं अमिताभ यांनी त्या ट्वीटमध्ये. अमिताभ यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं,''heart Pumping''. त्यांचे चाहते घाबरले ते ट्वीटमधील एका शब्दामुळे. अमिताभ यांनी स्पष्टिकरण देताना या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं होतं त्याचा खुलासा दुसऱ्या पोस्टमध्ये केला आहे.

ते म्हणालेयत,''मी पोस्टमध्ये म्हटलेल्या शब्दांचा संबंध हा शूटिंग दरम्यान माझं काम चोखं होणं याविषयीचा स्ट्रेस आणि काम चोख होण्यासाठीची छातीत होणारी धकधक,उत्सुकता यासंदर्भात आहे. तसंच फूटबॉल मॅचमध्ये माझ्या आवडत्या टीमच्या खेळासंदर्भात तो उल्लेख होता. कारण अशा निर्णायक क्षणी नेहमीच आपल्या हृद्याचे ठोके वाढतात. माझंही तसंच झालं होतं. अमिताभ सध्या मढ आयलंडमध्ये शूटिंग करीत आहेत. त्यांनी मढ ते जलसा बंगला या दरम्यानच्या प्रवासाचं वर्णनही आपल्या त्या पोस्टमध्ये केलं आहे. अमिताभ यांची ट्वीटरवरील ती पोस्ट इथे बातमीत जोडत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com