बंगल्याची कडक सुरक्षा भेदत घरात घुसला लहान मुलगा, पुढे जे घडलं त्यानं अमिताभ हैराण Amitabh Bachchan, Amitabh Bachchan Fan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan Fan breaks security cordon to touch his feet get autograph

Amitabh Bachchan: बंगल्याची कडक सुरक्षा भेदत घरात घुसला लहान मुलगा, पुढे जे घडलं त्यानं अमिताभ हैराण

Amitabh Bachchan: काही दिवसांपूर्वीच वयाची ८० वर्ष पूर्ण केलेले बॉलीवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन यांच्यावर प्रत्येक चाहत्याचं निरंतर प्रेम आहे. बिग बी यांचे सिनेमे पाहून मोठे झालेल्यांमध्ये भारतातील एका मोठा जनसमुदाय आहे,पण 'भूतनाथ' सारख्या त्यांच्या सिनेमामुळे लहान मुलांमध्ये देखील त्यांची क्रेझ पहायला मिळते. चाहत्यांचे प्रेम तर अमिताभ बच्चन यांना खूप मिळते,पण कधी कधी हे प्रेम वेगळ्या पद्धतीनं आपल्या या फेव्हरेट स्टारचं लक्ष आपल्याकडे वेधून घेताना दिसतात.(Amitabh Bachchan Fan breaks security cordon to touch his feet get autograph)

हेही वाचा: Video: नातवाला घेऊन बग्गीतून फिरायला निघाले आजोबा अनिल कपूर; आई सोनमही बाळाला छातीला बिलगून दिसली

बिग बी यांच्यासोबत नुकतेच असे काही घडले जेव्हा एका लहान मुलाला ते भेटले. अमिताभनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या या चाहत्याविषयी सांगितले आहे. चाहत्यांना आपल्याविषयी भावूक झालेलं पाहिलं की माझ्यात असं काय आहे हा प्रश्न मला सतावू लागतो असं अमिताभनी त्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Viral Photo: शाहरुखचा 'मन्नत' डायमंडनं सजला, बंगल्याबाहेर रोजपेक्षा दुपटीनं वाढली पाहणाऱ्यांची गर्दी...

आपल्या ब्लॉगच्या पोस्टमध्ये बच्चन यांनी सांगितलं आहे की हा छोटा चाहता माझ्या घराची कडक सुरक्षा व्यवस्था भेदत मला भेटायला पोहोचला होता. अमिताभनी त्या लहान चाहत्यासोबतच्या भेटीचे काही विलक्षण फोटो देखील शेअर केले आहेत. बिग बी रोज आपल्या जलसा बंगल्या बाहेर मोठ्या संख्येनं जमा होणाऱ्या चाहत्यांना भेटतात. आणि बिग बी यांनी शेअर केलेल्या फोटोवरनं तरी दिसत आहे की त्यांचा हा चाहता या दरम्यानच त्यांना भेटायला आला होता.

Amitabh Bachchan Fan breaks security cordon to touch his feet get autograph

Amitabh Bachchan Fan breaks security cordon to touch his feet get autograph

अमिताभ यांनी लिहिलं आहे,''आणि हा छोटा मुलगा,ज्यानं वयाच्या चौथ्या वर्षी माझा डॉन पाहिला,आणि आज मला भेटायला थेट इंदौरला येऊन पोहोचला. तो मला भेटल्यावर डॉन विषयीच बोलत होता...संवाद,अभिनय आणि माझ्या सिनेमातील गाजलेल्या ओळी वगैरे..वगैरे...मला भेटायची त्याची खूप जूनी इच्छा पूर्ण झाली म्हणून तो रडू लागला आणि थेट माझ्या पायांवर झुकला,जे खरंतर मला मुळीच आवडत नाही,मला याचा राग येतो. पण इतक्या सुरक्षा व्यवस्थेला तोडून माझ्यापर्यंत मोठ्या कष्टानं पोहचल्याच्या त्याच्या इच्छेनं मी निःशब्द झालो. त्यानं माझं जे चित्र बनवलं होतं त्यावर मी स्वाक्षरी दिली आणि त्याच्या वडीलांनी मला लिहिलेलं पत्र देखील वाचलं''.

Amitabh Bachchan Fan breaks security cordon to touch his feet get autograph

Amitabh Bachchan Fan breaks security cordon to touch his feet get autograph

'कौन बनेगा करोडपती' मध्ये अमिताभची स्पर्धकांकडून जेव्हा प्रशंसा होते तेव्हा ते नेहमीच लाजल्यासारखे होतात. ''आपल्या या छोट्या चाहत्याच्या आपल्यावरील प्रेमानं,आपल्या प्रतीच्या आदरानं मला विचार करायला भाग पाडलं,माझ्यात असं काय आहे?. अमिताभ यांनी लिहिले आहे,माझ्या चाहत्यांच्या भावना काहीशा अशाच असतात. हे पाहून मी जेव्हा एकटा असतो तेव्हा विचार करू लागतो,हे माझ्या सोबत का होतं?कशासाठी आणि कधीपासून?''

अमिताभ बच्चन यांच्या सिनेमांविषयी बोलायचं तर सध्या त्यांच्या 'ऊंचाई' सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली पकड धरली आहे. अपेक्षेहून अधिक सिनेमा कमाई करताना दिसतोय. सिनेमात त्यांच्यासोबत अनुपम खेर,बोमन ईराणी,डॅनी देखील आहेत.