'अरे भूमी.. बॉलर म्हणजे काय? अमिताभ बच्चन यांनाच पडला प्रश्न

सकाळ न्यूज नेटवर्क 
Sunday, 31 May 2020

भूमीच्या कॉमेंटमधला एक शब्द बिग बिंना कळलाच नाही. त्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी बिग बींची धडपड सुरू होती. अखेर या शब्दाचा अर्थ भूमीनेच त्यांना सांगितला आहे.

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील अशा कलाकरांपैकी एक आहेत जे सोशल मीडियावर जास्त प्रमाणात सक्रिय असतात. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपले विचार मांडत असतात. बिग बी नेहमीच वेगवेगळे ब्लॉग्स लिहीत आणि फोटो पोस्ट करत चाहत्यांना अपडेट्स देत असताना. त्यांनी शेअर केलेल्या प्रत्येक ब्लॉग किंवा फोटोला त्यांचे चाहते चांगला प्रतिसाद देत असतात. अशातच त्यांनी एक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आणि त्या फोटोवर अभिनेत्री भूमी पेडणेकरने कॉमेंट केली आहे. मात्र तिच्या कॉमेंटमधला एक शब्द बिग बिंना कळलाच नाही. त्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी बिग बींची धडपड सुरू होती. अखेर या शब्दाचा अर्थ भूमीनेच त्यांना सांगितला आहे.

गेल्या 10 वर्षांत तिसऱ्यांदा असं घडल्याने मुंबईकर घामाघूम...
 

अमिताभ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका फोटो शेअर केला आहे. हा फोटोमध्ये दोन फोटो एकाच फ्रेममध्ये आहेत. ज्यामध्ये एक फोटो १९७६ मधला आणि एक फोटो २०२० मधला आहे. या फोटोवर भूमीने कॉमेंट केली आहे की,' ४४ वर्षे होऊन गेली आजही तितक्याच अविस्मरणीय भूमिका तुम्ही साकारता. मी सांगते तुम्हाला तुम्ही 'बॉलर' आहात.' भूमीच्या या कॉमेंटमधील 'बॉलर' या शब्दाचा अर्थ बिग बींना कळलाच नाही. त्यांना कुठेही या शब्दाचा अर्थ सापडला नाही. मग अखेर त्यांनी भूमीलाच याचा अर्थ विचारला आहे. त्यांनी कॉमेंट करत लिहिले की, 'अरे भूमी.. बॉलर म्हणजे काय? कधी पासून विचारतोय कोणीही सांगत नाही.' ही कॉमेंट केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. भूमीने देखील कॉमेंट करत याचा अर्थ सांगितला. ती म्हणाली,' बॉलरचा म्हणजे उत्तम, प्रभावशाली आणि दर्जेदार जे तुम्ही आहात.' असे तिने सांगितले. 

मुंबईतील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बिग बींनी शेअर केला या फोटोमध्ये एक फोटो १९७६ साली त्याच्या 'कभी कभी' चित्रपटातील आहे तर एक फोटो त्यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या २०२० सालामधील 'गुलाबो सिताबो' चित्रपटातील आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amitabh bachchan is frustrated as bhumi pednekar calls him baller again nobody is telling me what it means