Amitabh Bachchan: 'अमिताभ बच्चन यांनी घातला घागरा! आता रणवीर काय घालणार?'|Amitabh Bachchan Funny Dress fans | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan news

Amitabh Bachchan: 'अमिताभ बच्चन यांनी घातला घागरा! आता रणवीर काय घालणार?'

Amitabh Bachchan: बॉलीवूडचे शहनेशहा अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. वेगवेगळ्या पोस्ट करुन आपण सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे चाहत्यांना आवर्जुन सांगतही असतात. सध्या (Social media viral celebrity news) त्यांचा एक अजब - गजब फोटो व्हायरल झाला आहे. तो पाहून नेटकऱ्यांना हसू आवरलेलं नाही. त्यावरुन मात्र नेटकऱ्यांनी बिग बींना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी जो ड्रेस परिधान केला आहे (Entertainment News) तो पाहून आता रणवीर काय घालणार असा प्रश्नही बिग बींना विचारण्यात आला आहे.

अमिताभ यांची ती अजीबो गरीब वेशभूषा पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अमिताभ यांचे ते दोन फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. व्हाईट कलरची हुडी आणि ढगाळ झगा त्यांनी परिधान केला आहे. तो फोटो पाहून काहींनी अमिताभ यांना तर तुम्ही चक्क घागरा घातल्याचे म्हटले आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अमिताभ हे लवकरच कौन बनैगा करोडपतीचा (KBC) एक नवा सीझन घेऊन येणार (Amitabh Bachchan News) आहेत. त्याची चर्चा सुरु झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या सेटवरील तो फोटो शेयर केला आहे. बिग बी यांनी त्या फोटोवर कॅप्शन लिहिलं आहे की, मला परिधान करण्यासाठी पायजमा दिला आहे. ते पाहिल्यावर असं वाटलं होतं, कुणी साडीच फाडून दिली की काय, हे बाकी भारी आहे.

हेही वाचा: Video: 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत अभिनेत्री विशाखा सुभेदारची एण्ट्री

अमिताभ यांच्या त्या पोस्टवर त्यांच्या मुलीनं श्वेता बच्चन नंदानं सरप्राईज इमोजी शेयर केलं आहे. सोशल मीडियावर देखील त्या फोटोवर नेटकऱ्यांनी अमिताभ यांचं कौतूक केलं आहे. काहींनी त्यांना ट्रोलही केलं आहे. बिग बी तुम्ही तर आता रणवीर सारखे कपडे घालायला सुरुवात केली आहे. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, रणवीरच्या संगतीचा परिणाम बिग बी यांच्यावर झाला आहे.

हेही वाचा: Mani Ratnam: प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांना कोरोना, रुग्णालयात दाखल

Web Title: Amitabh Bachchan Funny Dress Fans Comment Look Like Ranveer Singh Social Media Viral Photo

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top