बायको कायम बरोबर असते... लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी Amitabh Bachchan यांनी सांगितलं सुखी संसाराचं रहस्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 amitabh bachchan, jaya bachchan, amitabh & jaya bachchan 50 th wedding anniversary

बायको कायम बरोबर असते... लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी Amitabh Bachchan यांनी सांगितलं सुखी संसाराचं रहस्य

amitabh bachchan jaya bachchan 50th anniversary news: आज अमिताभ बच्चन यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस. अमिताभ आणि जया यांच्या लग्नाला आज ५० वा वाढदिवस. ही एव्हरग्रीन जोडी गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.

अमिताभ आणि जया यांच्या सहवासाची साक्षीदार एक संपूर्ण पिढी आहे. आज या दोघांच्या सहजीवनाला ५० वर्ष पूर्ण होताच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉग मध्ये लग्नाच्या वाढदिवशी खास पोस्ट लिहिली आहे.

(amitabh bachchan jaya bachchan 50th wedding anniversary big b wrote romantic pos)

अमिताभ यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या ब्लॉगवर जाताना एक संक्षिप्त नोट लिहिली. "3 जून उजाडतो.. आणि वर्षे 50 म्हणून मोजली जातात..

शुभेच्छांसाठी प्रेम आणि कृतज्ञता, त्या आल्या आहेत आणि कदाचित येतील.." अशी पोस्ट अमिताभ बच्चन यांनी लिहिली आहे.

याशिवाय अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन यांनी अमिताभ - जया यांचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

फोटो शेअर करताना, श्वेता बच्चनने पोस्टला कॅप्शन दिले, "50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - आता तुम्ही 'गोल्डन' आहात.. इतकी वर्ष टिकून राहणाऱ्या लग्नाचे रहस्य काय आहे असे विचारले असता, माझ्या आईने उत्तर दिले - प्रेम, आणि माझे वडील म्हणतात, बायको ही नेहमीच बरोबर असते."

श्वेताची मुलगी आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा हिने लाल हृदयाच्या इमोजीसह पोस्टवर प्रतिक्रिया दिली. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर जाताना, तिने अमिताभ आणि जया यांचा त्यांच्या 2001 मधील 'कभी खुशी कभी गम' चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केलाय.

तिने रेड हार्ट इमोजीसह "50 वर्षे" लिहिले. याशिवाय या फोटोसह तिने अभिमान मधील 'तेरी बिंदिया' हे गाणं जोडलं आहे. आज जगभरातले तमाम फॅन्स अमिताभ आणि जया यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या देत आहेत.