'KBC 14' च्या रजिस्ट्रेशनला आजपासून सुरुवात; जाणून घ्या याबद्दल Amitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh Bachchan

'KBC 14' च्या रजिस्ट्रेशनला आजपासून सुरुवात; जाणून घ्या याबद्दल

अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध 'कौन बनेगा करोडपती' या शो चा १४ वा सिझन पुन्हा एकदा लोकांना करोडपती बनवण्यासाठी भेटीला येत आहे. ९ एप्रिल २०२२ पासून केबीसीच्या १४ व्या सीझनसाठी रजिस्ट्रेशन सुरु होत आहे. आपणही यंदाच्या सीझनमध्ये करोडपती बनण्याची इच्छा मनात धरुन चालला आहात तर जाणून घ्या काय आहे रजिस्ट्रेशनची पद्दत.

हेही वाचा: रणबीर-आलियाच्या लग्नात जेवणातून 'नॉनव्हेज' आऊट? चक्क 25 काऊंटर 'वेगन'

कौन बनेगा करोडपती १४ मध्ये सामिल होण्यासाठी आज म्हणजेच ९ एप्रिल २०२२ पासून आपण रजिस्ट्रेशन करु शकता. यासाठी तुम्हाला फक्त अमिताभ बच्चन यांच्या द्वारा विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. बिग बी आज रात्री ९ वाजता आपल्याला एक प्रश्न विचारतील ,ज्याचं उत्तर उद्या म्हणेज १० एप्रिल २०२२ रोजी ९ वाजेपर्यंत द्यायचे आहे. जी लोकं जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं बरोबर देतील त्यांना पुढील राऊंडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. जर तुम्ही देखील 'कौन बनेगा करोडपती १४' मध्ये सामिल व्हायचा निश्चय केला असेल तर यासाठी चांगली तयारी करण्यास सज्ज व्हा. आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगतो की जेणेकरुन तुम्हाला हा राऊंड सहज पार करता येईल.

हेही वाचा: आलिया-रणबीरच्या कुटुंबियांकडून अखेर लग्नाचं पहिलं कन्फर्मेशन समोर

खालील गोष्टी लक्षात घ्याल तर नक्कीच तुमचं करोडपती बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकाल.

१. देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवा,वर्तमानपत्र वाचायची सवय लावा आणि नेहमी टी.व्ही वरच्या बातम्या पहा.

२. इतिहास,भूगोल अशा विषय़ांशी संबंधित पुस्तके वाचा आणि त्यातील महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या. १० वी इयत्तेच्या पुस्तकांची विशेष तयारी करा.

३.केबीसी मध्ये जसा शो रंगतो तशी अगदी आपल्या कुटुंबियांसोबत एक मॉक प्रॅक्टिस करा. यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल.

४. ज्या लोकांचा IQ लेवल चांगला आहे,त्या लोकांशी जास्तीत जास्त वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा.

हेही वाचा: Oscar 2022: विल स्मिथ 10 वर्षांसाठी 'बॅन'; काय म्हणालाय अभिनेता?

अर्थात,'केबीसी १४' चा प्रीमियर टी.व्ही वर कधी प्रसारित केला जाईल याबाबत अद्याप शो निर्मात्यांकडून कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. ऑगस्ट २०२२ मध्ये हा भव्य शो सुरु केला जाईल अशा आशा सर्वच जण व्यक्त करीत आहेत. सोनी एंटरटेन्मेंटवर हा शो रात्री ९ वाजता प्रसारित केला जाईल. सोनी लाइव्ह च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या शो चा आनंद प्रेक्षकवर्ग घेऊ शकणार आहेत,तो देखील मोफत.

Web Title: Amitabh Bachchan Kbc 14registration Start From 9 April 2022details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top