Sooryavansham:'अजून किती वर्ष पहायचा 'सूर्यवंशम'? वैतागून 'त्यानं' सोनी सेट मॅक्स चॅनलाच लिहिलं पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sooryavansham

Sooryavansham:'अजून किती वर्ष पहायचा 'सूर्यवंशम'? वैतागून 'त्यानं' सोनी सेट मॅक्स चॅनलाच लिहिलं पत्र

कोणतीही गोष्ट अति झाली तिची माती होते हे माहितच आहे असं काहीसं बिग बीच्या 'सूर्यवंशम' चित्रपटातचही काहीसं तसचं झालं आहे .हा चित्रपट रिलीज होऊन आज २४ वर्षे झाली आहेत . चित्रपट सोनी सेट मॅक्स चॅनलवर इतक्या वेळा दाखवण्यात आला आहे की चक्क आता एका व्यक्तीने सरळ चॅनलला पत्र लिहिले आहे. त्या व्यक्तीने चॅनलला विचारले आहे की, भविष्यात ते चॅनलवर हा चित्रपट किती वेळा दाखवणार आहेत?

हिरा ठाकूर किंवा विषारी खीर म्हटलं तर एकच चित्रपट आठवतो तो म्हणजे 'सूर्यवंशम' १९९९ साली आलेला हा चित्रपट. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन , दिवंगत साऊथ अभिनेत्री सौंदर्या, अनुपम खेर, दिवंगत कादर खान असे कलाकार होते.

अमिताभ बच्चनची भानु प्रतापची भूमिका प्रेक्षकांना आवडली . पण झालं असं की सोनी सेट मैक्स चॅनलवर प्रत्येक विकेंडला हा चित्रपट दाखवला जातो इतकेच नव्हेतर मध्ये सोनी सेट मैक्स चॅनलवर आयपीएल क्रिकेट मॅच चालू असताना देखील हा चित्रपट दाखवला जात असे.

हेही वाचा: Amala Paul: हिंदू नसल्याच म्हणत अभिनेत्रीला नाकारला मंदिरात प्रवेश

डि.के पांडे हे या 'सूर्यवंशम' चित्रपटाला इतके वैतागले आहेत की त्यांनी चक्क सोनी सेट मैक्स चॅनलला पत्र लिहिले आहे. ते पत्रात म्हणतात, "सोनी सेट मॅक्स चॅनलने सूर्यवंशम चित्रपटाचा ठेका घेतला आहे. तुमच्या कृपेने आम्ही आणि आमचे कुटुंब हिरा ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे ओळखत आहोत."

याशिवाय त्या व्यक्तीने विचारले, 'तुमच्या चॅनलने हा चित्रपट किती वेळा प्रसारित केला आहे? भविष्यात हा चित्रपट आणखी किती वेळा प्रसारित होणार? त्याचा आमच्या मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला तर त्याला जबाबदार कोण? कृपया कळवण्याची कृपा करावी...'

हेही वाचा: Shah Rukh Khan: शाहरुखचं ३२ वर्षांपासूनचं स्वप्न 'पठाण'मधून होतयं साकार...

टीव्ही चॅनलच्या नावाने लिहिलेले हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे. हे पत्र वाचल्यानंतर नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले - ही प्रत्येक भारतीयाची गोष्ट आहे जो सोनी सेट मॅक्स पाहतो. आणखी एका युजरने लिहिले की, 'या चित्रपटात बापूजींना दिलेली खीर मी प्यायली असती तर हे दिवस बघावे लागले नसते.' इतकेच नव्हेतर या चित्रपटातील काही सीन्सला घेऊन भन्नाट मिमस तयार झाले आहेत