'बिग बी' अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 

पीटीआय
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी यंदा महानायक अमिताभ बच्चन यांची निवड झाली आहे.

नवी दिल्ली : चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी यंदा महानायक अमिताभ बच्चन यांची निवड झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्‌वीटरवरून ही घोषणा केली. 

"आपल्या अभिनयाने दोन पिढ्यांना प्रेरणा देणारे, त्यांची करमणूक करणारे महान अभिनेते अमिताभ बच्चन यांची यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी एकमताने निवड झाली आहे. या निवडीमुळे संपूर्ण देश आणि जगभरातील त्यांचे चाहते आनंदी आहेत. अमिताभ यांचे अभिनंदन,' असे ट्‌वीट जावडेकर यांनी केले.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1969 पासून हा पुरस्कार दिला जातो. अमिताभ यांची निवड झाल्याचे जाहीर होताच, सोशल मीडियावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amitabh Bachchan selected for Dadasaheb Phalke award reveals Union Minister Prakash Javadekar