'बिग बी' यांची पान मसाला कंपनीला नोटीस; कारण...| Amitabh Bachchan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amitabh bach
'बिग बी' यांची पान मसाला कंपनीला नोटीस; कारण...

'बिग बी' यांची पान मसाला कंपनीला नोटीस; कारण...

बॉलिवूडचा शेहनशाह म्हणजे अभिनेते अमिताभ बच्चन यांची अजूही चाहत्यांमध्ये तेवढीच क्रेज आहे. तर वयाच्या ७९ वर्षी देखील ते फिट आणि अॅक्टीव आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त बिग बीने एक मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी पान मसालासोबतचा करार संपवला होता. पण आता करार संपल्यानंतर अमिताभ यांनी पान मसाला ब्रँडवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांसदर्भात त्यांनी ब्रँडला कायदेशीर नोटीस देखील पाठवली आहे.

अमिताभ यांनी कमला पसंद या पान मसाला ब्रँडची जाहिरात बराच काळ केली आहे, आणि त्यावर त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी पान मसाला ब्रँडसोबतचा त्यांचा करार संपवण्याचा निर्णय घेतला. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बींनी आता कंपनीला नोटीस पाठवली आहे. करार संपला असूनही, पान मसालाची जाहिरात, ज्यात बिग बी आहेत ती टीव्हीवर दाखवली जात आहे. म्हणून बिग बी यांनी हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: 'थुकरटवाडीत' आली 'लयभारी' जोडी

काही दिवसांपूर्वी अमिताभ आणि रणवीर सिंग यांनी एकत्र कमला पसंद या पान मसालाच्या जाहिरातीत काम केलं होतं. अजय देवगन आणि शाहरुख खान हे देखील ही पान मसाल्याच्या जाहिरातीमध्ये काम करतात. पण पान मसालाची जाहिरात केल्यामुळे अमिताभ यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. आणि त्यानंतर त्यांनी कमला पसंद या पान मसालाच्या ब्रँडसोबतचा करार संपवला.

loading image
go to top