अमिताभ म्हणतात, 'शशीजी… तुमच्या बबुआकडून…'

Amitabh Bachchan Shashi Kapoor
Amitabh Bachchan Shashi Kapoor

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर (वय 79) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी त्यांना ट्विटरवरुन आदरांजली वाहिली. परंतु, त्यांचे आणि अमिताभ बच्चन यांचे खास असे एक नाते होते. त्यामुळे शशी कपूर यांच्या जाण्याने अमिताभही भावूक झाले. 'To Shashji from your 'babbua' .. !!' असे म्हणत अमिताभ यांनी शशी कपूर यांच्यावर एक ब्लॉग देखील लिहिला आहे.

शशी कपूर यांच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा काही वेळातच रुमी जाफरी यांनी मला एक शेर पाठवला असे सांगत बिग बींनी त्याच ओळी लिहित आपल्या ब्लॉगची सुरुवात केली आहे.

''हम ज़िंदगी को अपनी कहाँ तक सम्भालते  
इस क़ीमती किताब का काग़ज़ ख़राब था'' 
असे म्हणत त्यांनी आपल्या आणि शशी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

यावेळी बिग बींनी, आपण शशी कपूर यांच्या व्यक्तिमत्वाने कसे प्रभावित झालो होतो. तसेच त्यांची हेअरस्टाईल आणि वागण्याची पद्धत कॉपी करण्याचा प्रयत्न करायचो. अशा अनेक आठवणी लिहिल्या आहेत. 

'दिवार' चित्रपटातील या दोघांचा 'मेरे पास मां है' हा डायलॉग चांगलाच गाजला होता. त्यालाच उजाळा देत अमिताभ यांनी 'अब मेरे पास भाई नहीं है। असे म्हटले आहे.  

साठच्या दशकात आपण जेव्हा स्ट्रगलर होतो तेव्हा एका मासिकाच्या कव्हरपेजवर आपण शशी कपूर यांचा फोटो पाहिल्याचे अमिताभ यांनी सांगितले आहे. त्यामध्ये राज आणि शम्मी कपूरचे छोटे भाऊ शशी कपूर यांचे लकरच चित्रपटात पदार्पण असे म्हटले होते. त्यावेळी अशी लोक आपल्या आजूबाजूला असतील तर आपला टिकाव लागणार नाही असे वाटल्याचे अमिताभ यांनी सांगितले. 

अमिताभ आणि शशी कपूर यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. तेव्हा आपली मैत्री घट्ट झाल्याचेही अमिताभ यांनी म्हटले आहे.

शशी कपूर त्यांच्या पत्नी जेनिफर यांच्या निधनानंतर ते एकटे पडले होते. त्यांनी सर्वांपासून आपला संपर्क तोडला होता. त्यानंतर काळ गेला, जाणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत त्यांची तब्येत खालावत गेली. आपण रुग्णालयात शशीजींची भेट घेतल्याचे बिग बींनी स्पष्ट केले. परंतु, त्यानंतर मात्र आपण त्यांची भेट घेण्याचे टाळले. कारण, आपल्या अगदी जवळच्या मित्राला रुग्णालयात त्या अवस्थेत पाहण्याची इच्छाच नव्हती, असेही आमिताभ यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

शशी कपूर यांच्या जाण्याने माझ्या आणि त्यांच्या आयुष्यातील काही पानं अर्धवटच राहिल्याची भावना बिग बींनी व्यक्त केली आहे. 

                                                     ~ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com