esakal | तो फोटो अमिताभ यांचा नाहीच, नेटकरी म्हणाले 'हा तर...'
sakal

बोलून बातमी शोधा

amitabh bachchan

तो फोटो अमिताभ यांचा नाहीच, नेटकरी म्हणाले 'हा तर...'

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) हे सोशल मीडियावर त्यांचे वेगवेगळे फोटो शेअर करत असतात. नुकताच त्यांनी 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेशमा और शेरा' या चित्रपटामधील त्यांच्या लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटमध्ये अमिताभ यांनी डोक्यावर पगडी, कानात आणि गळ्यात दागिने असा राजस्थानी लूक केलेला दिसत आहे. नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांच्या या फोटोला पसंती दिली असून अनेक कलाकारांनी त्यांच्या फोटोवर कमेंट केल्या आहेत.(amitabh bachchan shares old pic fans say he is looking like sonu sood)

अमिताभ यांनी या फोटोला कॅप्शन, 'रेशमा और शेरा या चित्रपटाच्या लुक टेस्टचा हा फोटो. हा फोटो 1969 मधील आहे. तेव्हा त्या लूक टेस्टमध्ये माझी निवड झाली होती.' अमिताभ यांच्या या फोटोवर रणवीर सिंग आणि सोनू सूद यांनी कमेंट केल्या आहेत. तर अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदाने देखील कमेंट करत या फोटोला पसंती दिली आहे. अमिताभ यांच्या एका चाहत्याने त्यांच्या या फोटोवर कमेंट केली, 'तुम्ही या फोटोमध्ये सोनू सूदसारखे दिसत आहात.' तर दुसऱ्याने लिहीले, 'पहिल्यावेळी हा फोटो पाहिल्यावर मला या फोटोमध्ये अभिनेता सोनू सूद आहे असे वाटले.'

हेही वाचा: 'बिग बी' म्हणाले म्हणून बदलला 'राष्ट्रपती भवनातील' नियम

अभिनेता सोनू सूद अमिताभ बच्चन यांचा चाहता आहे. त्याने 'कौन बनेगा करोड पती' या शोमध्ये काही दिवसांपुर्वी हजेरी लावली होती. त्यावेळी सोनूने त्याच्या, 'आय एम नॉट मसिहा' या पुस्ताकाबद्दल सांगितले होते. गेली कित्येक वर्ष 'कौन बनेगा करोड पती' या शोचे सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करत आहेत.

हेही वाचा: सलमानपासून दूर राहणं माझ्यासाठी चांगलं; एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा

loading image