esakal | सलमानपासून दूर राहणं माझ्यासाठी चांगलं; एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

salman khan,somy ali

सलमानपासून दूर राहणं माझ्यासाठी चांगलं; एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

अभिनेत्री सोमी अली (somy ali) आणि सलमान खान (salman khan) हे दोघे 90 च्या दशकातील सर्वांत चर्चेत असणारे कपल होते. सोमी आणि सलमानचा 1999 साली ब्रेक-अप झाला. ब्रेक-अपच्यानंतर सोमीने सलमानसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सोमीने 'बुलंद' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच्या आठवणी सांगितल्या आहेत.(somy ali shared memories of relationship with salman khan)

मुलाखतीमध्ये सोमी म्हणाली, 'सलमानने तेव्हा स्वत;चे प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते. त्या प्रोडक्शन हाऊसच्या 'बुलंद' या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी त्याने माझी निवड केली. आम्ही त्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी काठमांडू येथे गेलो होतो. पण काही कारणांमुळे तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. मी तेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये नवी होते आणि वयाने लहान देखील होते. तो चित्रपटमुळे माझ्या आणि सलमानच्या नात्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती.' पुढे ती म्हणाली, 'मी गेली पाच वर्ष सलमानच्या संपर्कात नाही. मी त्याच्यापासून दूर गेले आहे. मला माहित नाही की 1999 साली मी सलमान सोबत ब्रेक-अप केल्यानंतर त्याच्या आयुष्यात किती मुली येऊन गेल्या पण मी सलमानला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते. मला माहित आहे की त्याची बिंग ह्यूमन ही एनजीओ खूप चांगले काम करत आहे. सलमानपासून दूर राहणे माझ्यासाठी खूप चांगले आहे.'

हेही वाचा: Cannes Film Festival 2021; 'टायटन' ठरला 'सर्वोत्कृष्ठ' चित्रपट

एका मुलाखतीमध्ये सोमीने सांगितले होते, 'आम्ही दोघे एकमेकांच्या आयुष्यामधून बाहेर पडलो आहोत. त्याने मला धोका दिला होता. त्यामुळे मी त्याच्यासोबत ब्रेक-अप केला.' सोमीने बॉलिवूमधील सैफ अली खान, मिथून चक्रवर्ती, सुनील शेट्टी या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

हेही वाचा: 'आर्थिक संकटात होतो तेव्हा...' ; राजपाल यादवने सांगितल्या आठवणी

loading image