Amitabh Secret: 'या' दोन रंगांचे कपडे रीजेक्ट करतात अमिताभ, खुलासा करत डिझाईनरनं सांगितलं कारण...

अमिताभ यांचे वय भलेही ८० झाले असेल तरी फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत मात्र आजचे भले-भले अभिनेते त्यांच्यासमोर गुडघे टेकतील.
Amitabh Bachchan Stylist reveals secrets about big b fashion style
Amitabh Bachchan Stylist reveals secrets about big b fashion styleEsakal
Updated on

Amitabh Secret: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबर,२०२२ रोजी ८० वर्षांचे झाले. कधीही न थकता सतत काम करणाऱ्या अमिताभची एनर्जी तरुणांना लाजवेल अशीच आहे. आणि बिग बीं सोबत काम करणारे असे कितीतरी लोक आहेत जे त्यांच्यासाठी काम करताना स्वतःला पूर्ण झोकून देतात पण आपल्या या महान अभिनेत्याला कधी नाराज होवू देत नाहीत. बिग बी सोबत काम करणारी डिझाइनर आणि स्टायलिस्ट त्यांनी ट्रेंड सोबत रहावं म्हणून खूप मेहनत घेते. अमिताभ यांच्या स्टायलिस्टनं ते प्रत्यक्षात किती फॅशन प्रेमी आहेत याविषयी एका मुलाखतीत खुलासा केला आहे.(Amitabh Bachchan Stylist reveals secrets about big b fashion style)

Amitabh Bachchan Stylist reveals secrets about big b fashion style
Amitabh Bachchan: १९९२ ची गोष्ट, जेव्हा जया बच्चन यांच्यावर पत्रकारांसमोरच भडकले होते बिग बी

आपल्यापैकी अनेक जणांना माहीत असेल की अमिताभ यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की त्यांचे सिनेमे एकापाठोपाठ एक असे फ्लॉप होत होते आणि ते कर्जात पूर्ण बुडालेले होते आणि त्याचवेळी कौन बनेगा करोडपती हा शो त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरला. अमिताभचं नशीबच या शो नं बदललं. या शो मुळे अमिताभ यांना पुन्हा यश चाखायला मिळालं. घराघरात पाहिल्या जाणाऱ्या या शो मुळे अमिताभचे सिनेमेही लोकांपर्यंत पोहोचू लागले. कितीतरी मुलाखतींमधनं बिग बी यांनी या शो बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभचे सूटही आपल्याला सर्वाधिक आकर्षित करतात. आणि त्यांच्या स्टायलिंगचं श्रेय जातं ते डिझायनर प्रिया पाटील हिला.

Amitabh Bachchan Stylist reveals secrets about big b fashion style
Viral Video : 'स्कूल चले हम'; पाठीवर दप्तर टाकून कुत्रे पाहतायत स्कूल बसची वाट

शो दरम्यान अमिताभ घालणारे सूट्स,कोट-पॅंट,ड्रेसेस सगळ्यासाठी स्टायलिंग केलेली प्रिया आता बिग बी यांच्या आवडी-निवडी अगदी अचूक ओळखू लागलीय. अमिताभ यांच्या डिमांड आधीच तिला समजतं की त्यांना कशा पद्धतीचा सूट किंवा कपडे हवेयत. अमिताभ यांनीच आपल्याला ही संधी दिल्याचं प्रिया म्हणाली. ती म्हणाली, ''अमिताभ यांच्या घरीच आमची पहिली भेट झाली होती. मी नेहमीच त्यांना त्याआधी पडद्यावर पाहत आले होते आणि अचानक प्रत्यक्ष पाहिल्यावर मी स्तब्ध झाले होते. ते खूपच प्रोफेशनल आहेत,पण त्यांनी पहिल्याच भेटीत माझं टेन्शन घालवलं''.

Amitabh Bachchan Stylist reveals secrets about big b fashion style
Amitabh Property: अमिताभचं मृत्यूपत्र, करोडोंची संपत्ती,घर,नेट वर्थ... जाणून घ्या याविषयी

अमिताभ बच्चन यांच्यासाठी काहीतरी डिझाइन करायचंय तर माझ्यावर नेहमीच दडपण असतं असं प्रिया म्हणाली. ''माझा नेहमी प्रयत्न असतो की त्यांच्या कोटच्या बटन्सचे होल बरोबर असायला हवेत, जॅकेटचं झीपर लॉक सहज असावं,टाइट नसावं,फॅब्रिकचं मटेरियल सॉफ्ट असावं,बटन शार्प नकोत म्हणजे त्यांच्या बोटांना लागणार नाही ते बटन्स लावताना, इतकं बारीक-सारीक गोष्टी मी आवर्जुन पाहते. आणि एवढं सगळं त्यांच्यासाठी मी करते कारण ते त्या पात्रतेचे आहेत. कधीकधी चुका होतात तेव्हा ओरडा पडतो ,पण ते तर होतंच, आमचं नातं शिक्षक-विद्यार्थ्याचं आहे''.

Amitabh Bachchan Stylist reveals secrets about big b fashion style
KBC14:स्पर्धकानं विचारलं,'तुमचे कपडे कोण धुतं, कपडे रिपीट करता का?; उत्तर देत अमिताभनी मारला सिक्सर

याच मुलाखतीत प्रियानं अमिताभना सूटसाठी कोणते रंग पसंत नाहीत याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली,''अमिताभना ब्लॅक कलर, नेवी ब्ल्यू सारखे गडद रंग खूप आवडतात. त्यांना ब्राऊन आणि ग्रे कलर आवडत नाहीत. त्यांना वाटतं की हे कलर त्यांच्या स्कीन कलरला मॅच करतात. आणि ते त्यांच्यावर चांगले दिसत नाहीत. त्यासोबतच प्रिया म्हणाली,''त्यांचा फेव्हरेट गो टू आऊटफिट हा हूड आणि ट्रॅंक पॅंट्स आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये ते सोबत नेहमी स्वतःसोबत स्लिंग बॅग ठेवतात''. अशा अनेक अमिताभच्या फॅशन संदर्भातील आवडी-निवडी डिझायनर प्रिया पाटीलने शेअर केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com