'बस दाढ़ी बढ़ती जा रही है'; या पोस्टमधून काय म्हणायचंय अमिताभना?

बिग बी यांच्या पोस्टवर चाहत्यांनी व्यक्त केली काळजी
Amitabh Bachchan
Amitabh BachchanGoogle

कोरानानं पुन्हा आपलं डोकं वर काढलं अन् अनेकांच्या पोटाचा प्रश्न उभा राहिला. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थातच मनोरंजनसृष्टीलाही मोठा फटका बसला. यादरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या अनेक सिनेमांच्या बॉक्सऑफिस कलेक्शनवर परिणाम झाला. कबिर खान दिग्दर्शित '83' हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. सरकारनं नियमावली कडक केल्यानं मग तातडीनं अनेक निर्मात्यांनी आपल्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या,कुणी प्रमोशन थांबवली,अनेकांनी तर सिनेमांच्या शुटिंगच्या तारखाही पुढे ढकलल्या. या सगळ्याचा परिणाम झाला की सध्या अनेक कलाकार कामाविना आहेत. कुणी सुट्ट्या एन्जॉय करतंय,तर कुणी कामाविना वेळ जात नाही म्हणून उदास आहे. दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan)यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली जिच्यात त्यांनी कोरोनामुळे कामाविना बसावं लागतंय यासंदर्भाशी साधर्म्य साधणारं वक्तव्य केलंय. काय आहे नेमकी ती पोस्ट?

अमिताभ यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक दाढी वाढवलेला फोटो शेअर केलाय. ज्यात त्यांनी फ्रेमिंग अगदी टाइट ठेवलंय. म्हणजे झुम करुन काढलेला तो फोटो आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकूत्या अगदी ठळक उठून दिसत आहेत. पण त्याचवेळी त्यांच्या डोळ्यात असलेली चमक मात्र भविष्याविषयीची त्यांच्यात असलेली सकारात्मकता जागृत ठेवून आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं छान स्माइल आपल्यात पाॉझिटीव्हिटी निर्माण करतं. या फोटोला कॅप्शन दिलयं की.''काम वाम सब बंद है,बस दाढी बढती जा रही है....'' यातनं त्यांनी सूचित तर केलंय की सध्या ते आराम करतायत,काम बंद आहे,कारण शूटिंग बंद आहेत पण दाढीबद्दलचं वाक्य नमूद करून आधीच्या वाक्यानं आलेली गंभीरता काहीशी कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केलेला दिसतोय.

Amitabh Bachchan
आर्यन खानबद्दल शाहरुखनं केलं मोठं वक्तव्य

अर्थात अमिताभ बच्चन या व्यक्तिमत्त्वातच खूप सकारात्मकता ठासून भरलीय. त्यांच्या सगळ्याच पोस्ट वैचारिक बैठक असलेल्या अनं अनेकदा उर्जा देणाऱ्या असतात. ही त्यांची व्हायरल झालेली पोस्टही काहीशी अशीच आहे. त्यांच्या या पोस्टवर बिपाशा बासून 'क्यूट' असं कमेंटबॉक्स मध्ये लिहिलंय. तर आराध्या बच्चनने आजोबांची पोस्ट लाईक केलीय. पण ,अमिताभ यांच्या चाहत्यांनी मात्र त्यांच्या या पोस्टवर काळजी व्यक्त केलेली दिसून येते. खरंच,ही पोस्ट आयुष्याचे दोन अर्थ सांगणारी आहे. आपण जो चांगला तो अर्थ घ्यायचा. आणि कायम सकारात्मक रहायचं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com