Amol Bawdekar: गायक, अभिनेता आणि आता थेट स्त्री व्यक्तीरेखा.. अमोल बावडेकरची दमदार एंट्री.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Bawdekar grand entry in pratishodh marathi serial

Amol Bawdekar: गायक, अभिनेता आणि आता थेट स्त्री व्यक्तीरेखा.. अमोल बावडेकरची दमदार एंट्री..

pratishodh: सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. आता 'प्रतिशोध' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहेत. निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर आता अजून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 'प्रतिशोध' या नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल बावडेकर यांचा हा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे.

(Amol Bawdekar grand entry in pratishodh marathi serial)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: उशिरा आली अन लवकर गेली.. स्नेहलता वसईकर घराबाहेर..

अमोल बावडेकर सोबतच पायल मेमाणे हि सुद्धा पाहायला मिळत आहे. ममताच्या मुलीची म्हणजेच दिशा ची व्यतिरेखा यात ती साकारताना दिसणार आहे. पण मालिकेत भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांच्या भविष्यात काय अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

निरनिराळ्या धाटणीच्या मालिका आणि विषय सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळत आहेत. त्यातच आता एक थरारक मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेची पहिली झलकदेखील उत्कंठावर्धक रितीने प्रेक्षकांसमोर आली आहे.

यामध्ये अमोल एका स्त्री व्यक्तीरेखेत दिसत आहे. तो तृतीयपंथी असल्याचे या ट्रेलरवरुन लक्षात येते. शिवाय त्याला एक मुलगी पण आहे. दोघेही सोन्याचे दागिने खरेदी करत असताना दिसत आहे. तर इतर ग्राहक त्यांच्या विषयी चर्चा करत आहेत. आता ही प्रकारण नेमकं काय आहे, ही लवकरच उलगडेल.

टॅग्स :Marathi Serial