अमृता फडणवीस यांचे मराठीत पार्श्वगायन  

टीम ई सकाळ
शनिवार, 29 जुलै 2017

रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित 'अ ब क' या मराठी चित्रपटासाठी  अमृता देवेन्द्र फडणवीस यांनी नुकतेच पार्श्वगायन केले. ‘पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ असे गीताचे बोल असून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावरती भाष्य करणाऱ्या चित्रपटात त्यांनी मराठी आणि हिंदी अशी दोन गीते गायली आहेत. या गीतांना प्रसिद्ध संगीतकार बापी  - टूटूल यांनी संगीतबद्ध केले असून मराठी गीत अश्विनी शेंडे तर हिंदी गीत शामराज दत्ता यांनी लिहले आहे.    
 

पुणे: ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित व रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित 'अ ब क' या मराठी चित्रपटासाठी  अमृता देवेन्द्र फडणवीस यांनी नुकतेच पार्श्वगायन केले. ‘पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ असे गीताचे बोल असून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावरती भाष्य करणाऱ्या चित्रपटात त्यांनी मराठी आणि हिंदी अशी दोन गीते गायली आहेत. या गीतांना प्रसिद्ध संगीतकार बापी  - टूटूल यांनी संगीतबद्ध केले असून मराठी गीत अश्विनी शेंडे तर हिंदी गीत शामराज दत्ता यांनी लिहले आहे.    
 
या वेळी अमृता फडणवीस म्हणाल्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’ सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची आज गरज आहे. मुला मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना ही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे. हे गीत प्रत्येक स्त्रिला प्रेरणादायी ठरेल. अशी भावना व्यक्त अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.
 
'अ ब क' या चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेडगे हे असून चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांचे आहे. पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ या गीताचे अनावरण ५ ऑगस्ट रोजी श्री. श्री. श्री. रविशंकर यांच्या बेंगलोरच्या आश्रमात श्री. श्री. श्री. रविशंकर, किरण बेदी, अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत  होणार आहे. 
 
 
 

Web Title: Amrita phadanvis sings a song in marathi movie esakal news