Happy Birthday Amrita Singh: सैफ अली खान नव्हे, या क्रिकेटरसोबत अमृता सिंगला करायचं होतं लग्न, पण...

अमृता 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिने एकामागून एक अनेक यशस्वी चित्रपट केले.
Amrita Singh
Amrita SinghSakal

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग 9 फेब्रुवारीला तिचा 65 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृता 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिने एकामागून एक अनेक यशस्वी चित्रपट केले. यानंतर तिच्या आयुष्यात सैफ अली खान आला आणि दोघांनी 1991 मध्ये लग्न केले.

मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि 2004 मध्ये दोघे वेगळे झाले. त्यावेळी अमृता तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. कारण तिची प्रेमकथा इतर कथांपेक्षा खूप वेगळी होती. सैफ आणि अमृताच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण फार कमी लोकांना हे माहित असेल की, सैफच्या आधी अभिनेत्रीला रवी शास्त्रीसोबत लग्न करायचे होते.

होय! क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांचे एकमेकांवर प्रेम होते. पण एका अटीमुळे त्यांचे नाते तुटले. रवी शास्त्रींना अमृताने लग्नानंतर चित्रपटात काम करावे असे वाटत नव्हते, अमृताला ही अट आवडली नाही आणि त्यांचे नाते तुटले.

रवी शास्त्रीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विनोद खन्ना यांनी अमृताच्या आयुष्यात प्रवेश केला. दोघांनी 'बंटवारा' चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले. विनोद खन्ना विवाहित होते आणि यामुळे नंतर अमृताची आई नाराज झाली. तिने हे नाते मान्य केले नाही, ज्यामुळे हे दोघे वेगळे झाले.

Amrita Singh
Bigg Boss 16: गौतम गुलाटीने केला गोप्यस्फोट, फिनालेपूर्वीच सांगितले विजेत्याचे नाव

सैफ अली खान पहिल्याच नजरेत अमृताच्या प्रेमात पडला असे म्हटले जाते. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची भेट झाली. सैफ अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान होता, पण त्यांच्या प्रेमासमोर अभिनेत्रीला वयाचा फरक खूपच कमी दिसला आणि तिने तिच्या आईच्या विरोधात जाऊन सैफशी लग्न केले.

त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत. सैफने बॉलिवूड दिवा करीना कपूरशी लग्न केले असले तरी त्यांना दोन मुले आहेत. अमृता अजूनही अविवाहित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com