Amruta Fadnavis: अमृता फडणवीस आणि रियाज अलीच्या व्हिडिओवरुन भडकलाय वाद.. कारण..

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रियाज अलीने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय.
Amruta Fadnavis and Riyaz Ali's video sparked controversy
Amruta Fadnavis and Riyaz Ali's video sparked controversySAKAL

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बायको अमृता फडणवीस यांचं नवीन व्हिडिओ सॉंग 'मूड बनालीया' हे सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी रिलीज झालंय. अल्पवधीतच या गाण्याने मिलियन व्हूवर्सचा टप्पा ओलांडला आहे. या गाण्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

अनेकांनी या गाण्यावर रील व्हिडिओ शूट केले आहेत. आता स्वतः अमृता त्यांच्या नवीन गाण्यावर इंस्टाग्रामवर वर एक रील व्हिडिओ शूट केलाय. पण हा नवीन व्हिडिओ मात्र वादाचं कारण ठरला आहे.

Amruta Fadnavis and Riyaz Ali's video sparked controversy
Amruta Fadanvis : अमृता फडणवीस यांची ‘ती’ क्लिप वादाच्या भोवऱ्यात

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रियाज अलीने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलाय. अमृता फडणवीस आणि रियाज यांच्या या व्हिडिओची सध्या चर्चा आहे. परंतु हा व्हिडिओ राहिला बाजूला अनेकांनी या व्हिडिओखाली उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ वादाचं कारण ठरलाय.

हा व्हिडिओ शासकीय इमारतीत म्हणजेच उप मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात हा व्हिडिओ शूट झालाय असं वाटत असून लोकांनी व्हिडिओखाली कमेंट करत नाराजी व्यक्त केलीय. याशिवाय रियाज अली हा मुस्लिम आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा डंका वाजवणाऱ्या फडणवीसांच्या पत्नीने रियाज सोबत डान्स केला, हे सुद्धा अनेकांना पटत नाहिये.

Amruta Fadnavis and Riyaz Ali's video sparked controversy
Tejaswini Pandit: मैत्रिणीची सेटिंग करायला गेली आणि स्वतःचीच...

रियाज हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. रियाजचे सोशल मीडियावर २० मिलियनच्या वर फॉलोवर्स आहेत. अमृता आणि रियाज यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अमृता यांचं नवीन गाणं 'मूड बनालीया' ने १३ दिवसात ४५ मिलियन पेक्षा जास्त व्हूवर्सचा टप्पा ओलांडला आहे.

"अरे अमृता फडणवीस हे सर्व काय सुरु आहे!", अरे फडणवीस साहेब हे सर्व काय सुरु आहे, अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे अमृता फडणवीस यांचा हा नवीन व्हिडिओ सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com