अमृता फडणवीस यांचं 'नारी, मनहारी...सुकूमारी' गाणं; Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृता फडणवीस यांचं 'नारी, मनहारी...सुकूमारी' गाणं; Video Viral
अमृता फडणवीस यांचं 'नारी, मनहारी...सुकूमारी' गाणं; Video Viral

अमृता फडणवीस यांचं 'नारी, मनहारी...सुकूमारी' गाणं; Video Viral

श्रीलंकन गायिका योहानीनं माणिके हिथं गायलं. अर्थात गाणं तिचचं होतं. त्यानंतर ते जगभरात व्हायरल झाले होते. हिंदी बिग बॉसमध्ये सलमान खाननं योहानीला आपल्या शो मध्ये बोलावलं होतं. त्यामध्ये सलमाननं ते गाणं गायलं होतं. त्यालाही योहानीनं ते गाणं आपल्या सोबत म्हणण्याची विनंती केली होती. सलमानलाही त्या गाण्याचे बोल म्हणता आले नव्हते. त्यानंतर काही दिवसांनी राणू मंडलनं या गाण्याची कॉपी केली. आणि ते गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता ते गाणं चक्क माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीस यांनी गायले आहे.

अमृता यांनी योहानीच्या माणिके मागे हिथे या गाण्याला चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्याला श्रोत्यांचा नेहमीच मोठा प्रतिसाद मिळतो. त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांवर चाहत्यांनी तितक्याच उस्फुर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमृता यांच्या नव्या गाण्याचे वेध चाहत्यांना लागले होते. आता या नव्या गाण्यानं त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या काळात देखील अमृता फडणवीस यांच्या गाण्यानं श्रोतृवर्गाचे लक्ष वेधून घेतले होते.

वास्तविक ते मुळ गाणे सिंहाली भाषेतील असून ते श्रीलंकन गायिका योहानी दिलोका डी सिल्वानं गायलं आहे. त्या गाण्याला आतापर्यत लाखो हिट्स मिळाले आहेत. या गाण्याचे वैशिष्टय म्हणजे त्याचा अर्थ श्रोत्यांना जरी कळला नसला तरी त्या गाण्याच्या संगीतानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. आतापर्यत कोट्यवधी लाईक्स आणि व्ह्युज त्या गाण्याला मिळाले आहेत. अमृता यांनी याच गाण्याचे मराठी व्हर्जन गायले आहेत. त्यामध्ये त्यांनी या गाण्यावर नृत्यही केल्याचे दिसून आले आहे.

loading image
go to top