अमृता फडणवीस आता चित्रपटात गाणार, नवीन गाणं लाँच! तुम्हीही म्हणाल क्या... - Amruta Fadnavis New Song | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस आता चित्रपटात गाणार, नवीन गाणं लाँच! तुम्हीही म्हणाल क्या...

आपल्या अनोख्या आवाजाने कमी वेळात म्युझिक इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अमृता फडणवीस यांचे नवे गाणे लाँच झाले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांची गाणी अनेकदा चर्चेचा विषय बनतात. त्यांच्या गाण्यांना यूट्यूब आणि सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. (Amruta Fadnavis New Song)

दरम्यान आगामी BHARATEEYANS या चित्रपटातील अमृता फडणवीस यांनी गायलले गाणे प्रसिद्ध झाले आहे. 

अमृता फडणवीस ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे गाणे गायले आहे. आज प्रतासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं प्रसिद्ध करण्यात आले आहे. सत्या कश्यप यांचे हे गाणे आहे. 

अमृता फडणवीसांच्या गाण्याबद्दल बऱ्याच चर्चा होतात. मात्र त्यांच्या मनमोहक स्टाइलची बरीच चर्चा होत आहे. त्यांच्या मॉडर्न ज्वेलरी आणि वेस्टर्न लूकची चर्चा असते. दरम्यान, चाहते अमृताच्या नव्या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. अमृतांच्या नवीन गाण्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. 

नेटकऱ्यांनी अमृताचे कौतुक केले तर काहींनी तिला नेहमीप्रमाणे ट्रोल करण्यास सुरुवात केली. मात्र, नेहमीप्रमाणे यावेळीही अमृता फडणवीस ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत.

टॅग्स :Amruta Fadnavis