अमृता फडणवीसांची किचनमध्ये कल्लाकारी! देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हणाल्या...|Amruta Fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृता फडणवीस यांनी किचन कल्लाकार कार्यक्रमात हजेरी लावली.
अमृता फडणवीसांची किचनमध्ये कल्लाकारी! देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हणाल्या...|Amruta Fadnavis

अमृता फडणवीसांची किचनमध्ये कल्लाकारी! देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हणाल्या...

झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा कार्यक्रम सध्या गाजत आहे. या कार्यक्रमात नुकत्याच पार पाडलेल्या एपिसोडमध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आवडीच्या पदार्थांबाबात (Food) अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

हेही वाचा: Diabetes असलेल्यांनी 'या' 6 पांढऱ्या पदार्थापासून राहा दूर

पुरण पोळी

पुरण पोळी

अमृता यांना एका बैठकीत देवेंद्रजी किती किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न शोचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारला. त्यावर अमृता यांनी ते 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे असं म्हटलं आहे. तर ३०-३५ पुरणपोळ्या ते कसे खातात हे पाहायची इच्छा असल्याचेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा: वसंत ऋतूत आरोग्य जपायचंय! आयुर्वेदानुसार हा घ्या डाएट प्लॅन

या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. तेव्हा पत्नी सुगरण आहे की आई असा प्रश्न फडणवीस यांना प्रशांत दामले यांनी विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘प्रशांतजी असे प्रश्न विचारु नयेत. आईला म्हटले की तुझ्यापेक्षा बायकोच्या हातचा पदार्थ जास्त आवडतो तर आईला राग येणार नाही. पण जर याच्या उलट केले तर जगणे मुश्किल होई शकते. त्यामुळे असे प्रश्न विचारु नका.’ असे म्हटले. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्यासोबतच अभिनेत्री स्मिता जयकर आणि गायक स्वप्नील बांदोडकर हे कलाकार सहभागी आहेत.

हेही वाचा: व्यायाम- खाण्यादरम्यान नेमकं किती अंतर असावं? जाणून घ्या

Web Title: Amruta Fadnavis Shares Bjp Leader Devendra Fadnavis Secret Of Eating On Show Kitchen Kallakar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top