"दबंग 3'मध्ये एमी जॅकसन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट "ट्युबलाइट'ची चर्चा सगळीकडे सुरू आहे. त्यातच आता त्याच्या "दबंग 3' चित्रपटाच्या चर्चेलाही उधाण आले आहे. "दबंग 3' चित्रपटाच्या चर्चेला उधाण येण्यामागील कारण म्हणजे या चित्रपटात "दबंग फेम' सोनाक्षी सिन्हाऐवजी अभिनेत्री एमी जॅकसनची वर्णी लागली असल्याचे बोलले जात आहे. एमी जॅकसनने बॉलिवूडमध्ये अभिनेता प्रतीक बब्बरसोबत "एक दिवाना था' या चित्रपटातून करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर ती ऍक्‍शन हिरो अक्षयकुमारसोबत "सिंग इज ब्लिंग'मध्ये झळकली होती. आता "दबंग 3' मधील मुख्य नायिकेसाठी तिची वर्णी लागली असल्याचे सूत्रांकडून समजते.

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट "ट्युबलाइट'ची चर्चा सगळीकडे सुरू आहे. त्यातच आता त्याच्या "दबंग 3' चित्रपटाच्या चर्चेलाही उधाण आले आहे. "दबंग 3' चित्रपटाच्या चर्चेला उधाण येण्यामागील कारण म्हणजे या चित्रपटात "दबंग फेम' सोनाक्षी सिन्हाऐवजी अभिनेत्री एमी जॅकसनची वर्णी लागली असल्याचे बोलले जात आहे. एमी जॅकसनने बॉलिवूडमध्ये अभिनेता प्रतीक बब्बरसोबत "एक दिवाना था' या चित्रपटातून करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर ती ऍक्‍शन हिरो अक्षयकुमारसोबत "सिंग इज ब्लिंग'मध्ये झळकली होती. आता "दबंग 3' मधील मुख्य नायिकेसाठी तिची वर्णी लागली असल्याचे सूत्रांकडून समजते. याबाबत अद्याप अधिकृतरित्या काहीही समजलेले नाही. एमीने याबाबत सांगितले की, "सलमानसोबत काम करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मी त्यांच्यासोबत "किक'मधून पदार्पण करणार होते; पण त्या वेळी मी अन्य चित्रपटाचा करार केल्यामुळे मला ही संधी सोडावी लागली होती.' 

Web Title: Amy jackson dabhang 3