Anand Mahindra On Citadel: प्रियांकाची अ‍ॅक्शन अन् आनंद महिंद्रा शॉक! 'सिटाडेल' पाहिल्यानंतर ट्विट व्हायरल

Anand Mahindra On Citadel
Anand Mahindra On CitadelEsakal

Anand Mahindra On Citadel: बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राला तिच्या करिअरमध्ये खूप संघर्षाचा सामना करत आज या स्थानावर आहे. प्रियंका नुकतिच मेट गाला या फॅशन इव्हेंटमध्येही दिसली होती. तिचे बरेच व्हिडिओ आणि फोटो अजूनही सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मात्र अभिनेत्री सध्या तिच्या नवीन वेब सीरिज 'सिटाडेल' मुळे देखील सतत चर्चेत असते. सध्या ती पती निक जोनाससोबत अमेरिकेत राहते. आता प्रियांकाच्या वेब सीरिजने जागतिक लोकप्रियतेच्या चार्टमध्ये प्रथम स्थान गाठलं आहे.

Anand Mahindra On Citadel
Alia Bhatt Video: आपल्या पापाराझींनी टॉमला 'टोम्या' म्हटलं अन् तिकडच्यांनी अलियाला...

प्रियांका चोप्रा हॉलिवूड वेब सीरिजमध्ये एका गुप्तहेराच्या भूमिका साकारत आहे. मालिकेतील तिच्या जबरदस्त अॅक्शनची खूप चर्चा आहे. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राचा 'सिटाडेल' 28 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. रुसो ब्रदर्स निर्मित या मालिकेत देसी गर्ल एका गुप्तहेर नादिया सिंगची भूमिका साकारत आहे. आता तर महिंद्रा ग्रुपचे सीईओ आनंद महिंद्रा यांनी देखील प्रियांकाचे कौतुक केले आहे.

Anand Mahindra On Citadel
Rakul Preet Singh: क्रेझी फॅन! रकुलची एक झलक त्यानं केलं असं काही की अभिनेत्री म्हणाली...

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अलीकडेच प्रियंका चोप्राची टीव्ही मालिका 'सिटाडेल' पाहिली. यानंतर ते प्रियंका चोप्राचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. त्यानी सोशल मीडियावर सिटाडेलचं कौतुक केल आहे.

आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर 'सिटाडेल'चा व्हिडिओ शेअर केला. यासोबतच त्यानी प्रियांका चोप्रासाठी एक खास नोटही लिहिली आहे. प्रियांका चोप्राने सिरिजमध्ये तिच्या अ‍ॅक्शन स्टंटने बॉलिवूडच्या अनेक हिरोंना मागे सोडले आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Anand Mahindra On Citadel
Chirbhog: नॅशनल ह्यूमन राइट्सच्या ८ व्या शॉर्ट फिल्म स्पर्धेत मराठी लघुपटाने पटकावले पारितोषिक

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर लिहिलं की, "मी वीकेंडला 'सिटाडेल'चे पहिले दोन भाग पाहिले... रुसो ब्रदर्सच्या या ओटीटी मालिकेने मला पूर्णपणे खिळवुन ठेवलं होत... मी हलूही शकलो नाही. जरी मला स्टोरी काही खास वाटली नाही पण @priyankachopra ला अ‍ॅक्शन हिरो म्हणून बघणं खूप मोठा धक्का होता. तिने आपल्या अनेक मेल अ‍ॅक्शन  हिरोंला मागे सोडले आहे. लष्करींची मुलं कशी ताकदवान असतात. ती त्यात बसते. ती तिचे आयुष्य तिच्या परीने जगते पण आयुष्य जगत आहे आणि पुढे जात आहे. देव तिला आणखी शक्ती देवो."

Anand Mahindra On Citadel
PS 2 Box Office: 'पोन्नियिन सेल्वन 2' चं बॉक्स ऑफिसवरच युद्ध सुरुच! कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला..

प्रियांका चोप्राची ही हॉलिवूड सिरिज Amazon Prime Video वर स्ट्रीम होत आहे. 26 एप्रिल रोजी रिलीज होण्यासोबतच या मालिकेचे दोन भाग स्ट्रीम करण्यात आले. आता पुढचा भाग ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. पहिल्या दोन भागांना संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, यामध्ये प्रियांकाच्या अ‍ॅक्शनचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com